राजकारण

हे तर ‘महा विश्वास घातकी’ सरकार : जावडेकर

नवी दिल्ली : ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामाचा लेखाजोखा मांडताना भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार खडजंगी होताना दिसून येतेय. ठाकरे सरकारच्या दोन वर्षांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येतेय तर त्याला महाविकास आघाडीतील नेते प्रत्युत्तर देताना दिसून येत आहेत. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामावर जोरदार टीका केलीय.

प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलंय. राज्य सरकारला २ वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात जावडेकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जोरदार रंगू लागलाय.

मी नवे नाव देतोय, महा विश्वासघातकी सरकार, असं म्हणत जावडेकारांनी ठाकरे सरकारचं पुन्हा नव्यानं नामकरण केलंय. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली, असं म्हणत नाव न घेता जावडेकर यांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही. गृहमंत्री ६ महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असं कोणतं राज्य आहे? असा सवाल जावडेकर यांनी केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button