Top Newsराजकारण

‘बात निकलेगी तो दूर तलक जाएगी’; नवाब मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई क्रुज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, दररोज मलिक ट्विटरवरुन वानखेडेंवर निशाणा साधत असतात. अशाच प्रकारचे एक ट्विट आजही मलिक यांनी केले आहे.

नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप सुरू आहेत. समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी खासगी फौज आणली असून त्यात मनीष भानुशाली, सॅम डिसोझा यांच्यासह अनेक जण आहेत. ते ड्रग्जचा व्यवसायही करतात आणि लोकांना जाळ्यात अडकवतात, असे त्यांनी मंगळवारी म्हटले होते. तसेच, वानखेडे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

आजही नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे,’असे सूचक ट्विट मलिकांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. यात काहीजण मलिकांची बाजु घेत आहेत, तर काहीजण त्यांनाच ट्रोल करताना दिसत आहे. दरम्यान, या सूचक ट्विटवरुन मलिक नवा खुलासा करणार, असाही एक अंदाज लावला जात आहे.

याआधीही नवाब मलिक यांनी वानखेडे यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि एक अनोळखी फोन नंबर शेअर केला होता. या चॅटवरून असे दिसते की, वानखेडेनेंनी त्यांच्या बहिणीचे बिझनेस कार्ड आणि ऑफिसचे लोकेशन शेअर केले होते. मलिक यांनी आरोप केला की, समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी एक खासगी सैन्य आणले आहे, ज्यामध्ये मनीष भानुशाली, सॅम डिसूझा यांच्यासह अनेक लोक आहेत. ते ड्रग्जचा व्यवसायही करतात, लोकांनाही अडकवतात. वानखेडे यांच्या माध्यमातून कोट्य़वधी रुपयांची वसुली झाल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button