फोकस

नाशिकमध्ये आता हेल्मेट न घातल्यास थेट तुरुंगाची हवा

नाशिक : नाशिकमध्ये २९ जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’, ‘नो हेल्मेट २ तास समुपदेशाना’नंतर आता हेल्मेट नसल्यास कोणतेही सहकार्य न करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. तसा आदेशच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढला आहे. त्यानुसार, ६ नोव्हेंबर २०२१ पासून नाशिक शहरात शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश बंदी केली जाणार आहे.

शहरात पेट्रोलपंपावर विनाहेल्मेटधारक कर्मचार्‍यांशी वाद घालत असल्याच्या घडना घडल्या आहेत. विनाहेल्मेट दुचाकीचालकांना पेट्रोलपंप परिसरात बंदी केली जाणार आहे. तसेच त्यांनापेट्रोल पंपावर प्रवेश मिळणार नाही. ज्या पंपावर विनाहेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश दिला जाईल, त्या पंपाचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहे. प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणे, एम. आय. डी. सी. परिसर, शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व निम शासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश बंदी केली जाणार आहे. या सर्व ठिकाणी व पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत.

शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीचालक आढळून आल्यास त्यास ८ दिवसांचा तुरुंगवास किंवा १ हजार २०० दंड केला जाणार आहे. वाहतूक विभागाची भरारी पथके शासकीय व निमशासकीय ठिकाणी तपासणी करत संबंधित चालकांवर कारवाई करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button