राजकारण

हर्षवर्धन पाटलांनी स्वतःचा भ्रष्टाचार मान्य केला : चाकणकर

पुणे : मावळातील सोमाटने येथील एका हॉटेलच्या उदघाटन सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी, ‘भाजपात गेल्याने चौकशी नाही, शांत झोप लागते, असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या विधानावरून कार्यक्रमात हंशा पिकला. मात्र, मावळातील राजकीय वतुर्ळात या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर त्यांच्या विधानावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

‘भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं अस त्या म्हणाल्या आहेत. भाजपमुळे चौकशी नाही आणि महत्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार. असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button