राजकारण

मोफत वीजनंतर आता मोफत उपचार; केजरीवालांची पंजाबसाठी घोषणा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला आरोग्य सेवांची हमी दिली आहे. यात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यानंतर जनतेला मोफत उपचार, औषधं आणि चाचण्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासोबत केजरीवालांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार का? याबाबत विचारलं असता त्यांनी हा फक्त एक काल्पनिक प्रश्न असल्याचं केजरीवाल म्हणाले.

केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला ६ महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. यात आरोग्य क्षेत्राशी संबंधीत मोठ्या घोषणांचा समावेश आहे. केजरीवालांनी केलेल्या घोषणांमुळे आता पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघणार आहे. पंजाब काँग्रेसला तोडीस तोड आव्हान देण्याची तयारी आम आदमी पक्षानं केली आहे.

पंजाबमध्ये सरकारचा तमाशा

पाच वर्षांपूर्वी जेव्हा पंजाबमधील जनतेनं मोठ्या विश्वासानं काँग्रेसच्या हातात इथली सत्ता दिली होती. पण आज काँग्रेस काहीच काम करताना दिसत नाही. यांनी फक्त तमाशा सुरू केला आहे आणि खुर्चीसाठी घाणरडं राजकारण खेळलं जात आहे. त्यांच्यातील प्रत्येक नेत्याला आज मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे जनता त्रस्त झालीय, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

केजरीवालींनी दिलेली आश्वासने :

– पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीवर मोफत व उत्तम उपचार
– संपूर्ण उपचार, चाचण्या, औषधं मोफत देणार. शस्त्रक्रियेचा २० लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करणार
– पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला हेल्थकार्ड दिलं जाणार. यात एमआरआय, एक्स-रे इत्याही अहवाल सादर केले जातील.
– पंजाबमध्ये मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ‘पिंड क्लिनिक’ उभारले जाणार. याची एकूण संख्या १६ हजारांच्या आसपास असेल.
– पंजाबमधील सर्व शासकीय रुग्णालयांना अत्याधुनिक आणि स्वच्छ करणार. मोठ्या प्रमाणात नवी रुग्णालयं सुरू केली जाणार
– पंजाबमध्ये रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button