अर्थ-उद्योग

ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटर भारतीय बाजारपेठेसाठी युरोपियन स्‍टार्टअप्‍सना सहकार्य करणार

मुंबई : ९१स्प्रिंगबोर्डसह ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटर आता विशेष उपक्रम सादर करत आहे. हा उपक्रम भारतीय अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये युरोपियन स्‍टार्टअप्‍सना प्रवेश करण्‍याची सुविधा देतो. हा प्रकल्‍प युरोपियन स्‍टार्टअप्‍सची निवड करेल आणि त्‍यांना भारतीय कंपन्‍यांसोबत सहयोग करण्‍यास सुसज्‍ज करेल, ज्‍यामुळे भारत व युरोपदरम्‍यानच्‍या द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल. यामुळे युरोपियन स्‍टार्टअप्‍सना भारतामध्‍ये त्‍यांचा व्‍यवसाय लाँच करण्‍यासोबत विस्‍तारित करण्‍यामध्‍ये आणि त्‍यांच्‍या बाजारपेठ प्रवेश धोरणांमध्‍ये पाठिंबा देत व्‍यापक प्रमाणात प्रबळ स्‍थानिक नेटवर्क निर्माण करण्‍यामध्‍ये मदत होईल.

प्रकल्‍पाच्या समन्‍वयक सिव्हिटामधील इंद्रे कुलिकाउस्काइट सांगतात की, सुरूवातीला दोन्‍ही प्रांतांमधील ७० मुख्‍य इकोयंत्रणा कंपन्‍यांना त्‍यांच्‍या नेटवर्कमध्‍ये संलग्‍न करण्‍याचे आणि जवळपास ५०० परिपक्‍व युरोपियन स्‍टार्टअप्‍सना आंतरराष्‍ट्रीयीकरण प्रशिक्षण देण्‍याचे लक्ष्‍य आहे.

माहितीचे देवाणघेवाण करण्‍याच्‍या आणि एकमेकांसोबत सहयोग करण्‍याच्‍या महत्त्वाकांक्षेसह इकोयंत्रणा निर्माते, कॉर्पोरेट्स व सार्वजनिक कंपन्‍या नवप्रवर्तकांचा प्रमुख युरो-इंडियन समुदाय उपलब्‍ध करून देणारी अॅम्‍बेसेडर्सची टीम तयार करतील. इच्‍छुक कंपन्‍या www.euindiainnocenter.eu येथे नोंदणी करू शकतात.

जर्मन आंत्रेप्रीन्‍युअरशीप जीएमबीएचमधील ज्‍युलियन फ्रॉमटर यांनी युरोपियन व भारतीय नवप्रवर्तकांदरम्‍यान माहिती व तंत्रज्ञानांच्‍या देवाणघेवाणीच्‍या महत्त्वावर भर दिला. त्‍या म्‍हणाल्‍या, ”आम्‍ही युरोपियन उद्योजकांना परिपूर्ण पॅकेज देत भारतीय बाजारपेठेमध्‍ये यशस्‍वी प्रवेशाची खात्री देण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीयीकरण व प्रत्‍येक व्‍यवसाय विभागामधील सर्वोत्तम स्‍थानिक भागीदारांमधील अव्‍वल स्‍पेशालिस्‍ट्सना एकत्र आणतो.”

मंत्रा फाऊंडेशनमधील जय कृष्‍णनन म्‍हणाले, ”भारत २०२१ मध्‍ये झपाट्याने विकसित होणारी अर्थव्‍यवस्‍था बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. म्‍हणूनच युरोपियन नवप्रवर्तकांना नवीन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करण्‍याची आकर्षक संधी मिळाली आहे. ‘थिंक ग्‍लोबल, अॅक्‍ट लोकल’ उद्देश आत्‍मसात करू पाहणा-या युरोपियन नवप्रवर्तकांना या व्‍यासपीठावर विकासाच्‍या दिशेने वाटचाल करत असलेल्‍या भारतामध्‍ये स्‍टार्टअप्‍स निर्माण करण्‍याची यासारखी दुसरी संधी मिळू शकत नाही. जागतिक अर्थव्‍यवस्‍था विस्‍तारित होत असताना ईयू-इंडिया इनोव्हेशन सेंटर आंतरराष्‍ट्रीयीकरणापासून मोठ्या प्रमाणात बाजारपेठ प्रवेश सुविधा देणा-या अनेक ऑफरिंग्‍जसह भारताला प्रमुख गंतव्‍य बनवण्‍यामध्‍ये युरोपियन नवप्रवर्तकांसाठी महत्त्वपूर्ण व्‍यासपीठ असेल.

९१स्प्रिंगबोर्डमधील सुधीर के. व्‍ही. म्‍हणाले, ”आपला देश उगावता तारा असण्‍यासोबत जगातील सर्वात मोठ्या इकोयंत्रणांपैकी एक आहे. हा प्रकल्‍प विन-विन सहयोगांसाठी आंतरराष्‍ट्रीकरण व नवोन्‍मेष्‍कारामधील स्‍पेशालिस्‍ट्सना एकत्र आणतो. आम्‍ही भारतातील २०हून अधिक ठिकाणी आवश्‍यक असलेला सर्व पाठिंबा देण्‍यासाठी सुसज्‍ज आहोत.”

९१स्प्रिंगबोडमधील प्रतीक जैन म्‍हणाले, ”ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटर व्‍यासपीठ जागतिक स्‍तरावर स्टार्टअप इकोयंत्रणेला झपाट्याने विकसित करण्‍यासाठी २ अर्थव्‍यवस्‍थांना एकत्र आणेल आणि अर्थव्‍यवस्‍था झपाट्याने विकसित होत असताना भारतीय बाजारपेठेमध्‍ये प्रवेश करण्‍याची युरोपियन स्‍टार्टअप्‍ससाठी ही अगदी योग्‍य वेळ आहे. आम्‍ही भारतामध्‍ये ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटर कंपनी निर्माण करत सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तसेच भविष्‍यात देखील सर्वतोपरी पाठिंबा देण्‍यास उत्‍सुक आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button