राजकारण

सरकार पडलं की काय म्हणून मी सारखा झोपेतून उठतो…! अजितदादांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा टोला हाणला. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर अजितदादा यांनी ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार’, असं वक्तव्य केलं. अजितदादांच्या या उत्तरानं उपस्थित पत्रकारांनाही हसू आवरलं नाही.

अजित पवार यांनी यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला होता. चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

महाविकास आघाडी सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. १८ महिन्यांपूर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही १८ महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button