राजकारण

केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत; रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले

मुंबई : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित पवार इंधन दरवाढीवरून सरकारवर टीका करत आहे. त्यावर चंद्रकांत पाटलांनी दिलेला सल्ला आणि त्यावर रोहित पवारांचं उत्तर यामुळं या दोन नेत्यांमध्ये या मुद्द्यावर जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

रोहित पवार यांच्यासह अनेक नेते आणि इतर स्तरांतून सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून टीका होत आहे. पेट्रोल डिझेलचे दर सरकारनं की करण्याची मागणी केली जात आहे. या टीकेवर केंद्राच्या बाजुनं प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारकडं बोट दाखवलं होतं. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. पण जर राज्य सरकारला एवढं वाटत असेल तर त्यांनी पेट्रोलवरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा असं म्हटलं होतं.

चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला दिलेल्या सल्ल्यावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली. २०१४ च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी २०१४ च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज ३५० टक्क्यांनी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा ३२.९० रु तर राज्याचा २८.२५ रु कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. अशी टीका रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि त्याचवेळी केंद्रावरही केली.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारनं शेजारच्या राज्यांमध्ये असलेले इंधनाचे दर पाहावे. त्यानुसार आपले दर कमी करावे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावरूनही रोहित पवारांनी तौक्तेच्या मदतीचा संदर्भ देत टोला लगावला होता. शेजारच्या राज्यांना शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटींची मदत मिळते. तशी मदतही महाराष्ट्राला मिळत नाही, त्यामुळं हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले. त्यामुळं इंधन दरवाढ आणि त्यावर भाजप नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या समर्थनावर रोहित पवार यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारनं सर्व सामान्यांचा विचार करवा. इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास सामान्यांना जणं मुश्लिक होईल, असं ते म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button