आरोग्य

कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा दिलासा !

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती आता सुधारत आहे. शनिवारी राज्यातील कोरोना रिकव्हरीचा रेट ९२ टक्के पार झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार १३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८७ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५ लाख ५३ हजार २२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button