अर्थ-उद्योग

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ‘उन्नती’चे डिजिटल कार्ड लाँच

मुंबई : भारतातील कृषी क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. तरीही शेतकऱ्यांना कर्जाचा तुटवडा, शेतीची उत्पादने व बाजारपेठा आदींसह अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही खालावते. या समस्यांचा निपटारा करण्याकरिता तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ‘उन्नती’ या तंत्रज्ञान आधारीत अॅग्री इनपुट व अॅग्री प्रोड्यूस सेलिंग स्टार्टअपने पहिल्यांदाच डिजिटल एकिकृत कार्ड लाँच केले असून ते कंपनीच्या सर्व प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहे. याद्वारे बियाणे, खते व कीटकाशकेही खरेदी करता येतात. पेटीएम बँकेसोबत को-ब्रँड केलेल्या या कार्डद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून मिळालेले उत्पादन मोठ्या बाजारपेठेत विकता येते.

नव्याने लाँच केलेल्या कार्डमुळे शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. कारण याद्वारे बियाणे, खते कमी किंमतीत मिळतील तसेच त्यांनी शेतात घेतलेल्या उत्पादनांना अधिक चांगल्या दरात विकता येईल. यासह, कार्डद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नासह प्रत्येक पैलूने अपडेट्स मिळवता येईल. यामुळे त्यांना लवचिक व अखंड क्रेडिट दर मिळू शकतील.

आरबीआयच्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना कार्डची एकदाच २५० रुपये किंमत द्यावी लागेल, त्यानंतर शेतकऱ्यांना इतर सेवा मोफत दिल्या जातील. याद्वारे शेतकऱ्यांना जे फायदे मिळतील, त्यातून कार्ड मिळाल्याच्या पहिल्या दोन महिन्यातच ही किंमत वसूल होते. हे कार्डमुळे शेतकऱ्यांना बचतीची सवय लागेल. तसेच आधुनिक शेतीच्या पद्धतीसाठी तसेच उत्तम दर्जाचे व अधिक प्रमाणात उत्पादन मिळवण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यापासून वाचवता येईल तसेच देशातील शेतीला अधिक चांगल्या सुविधा पुरवता येतील.

उन्नतीचे सह संस्थापक श्री अशोक प्रसाद म्हणाले, “गेल्या काही वर्षात कृषी क्षेत्रात विक्रमी प्रगती झाली आहे. तरीही शेतकऱ्यांना विविध आघाड्यांवर दैनंदिन आव्हानांना सामोरे जावे लागते. उन्नती ही कंपनी देशातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजा पुरवण्याकरिता सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करते. उन्नती या अॅग्री-टेक स्टार्टअपने अशा प्रकारचे डिजिटल प्लॅटफॉर्मशी संलग्न असलेले उत्पादन लाँच केले असून इतर कोणत्याही ब्रँडने हे उत्पादन काढलेले नाही. याद्वारे शेतकऱ्यांना व्यवहारही करता येतात. आमच्या नव्याने लाँच झालेल्या कार्डद्वारे शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेची उत्पादने उपलब्ध करून देण्यास तसेच त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यास व याद्वारे त्यांचे एकूण उत्पन्न वाढवण्यास सक्षम केले जाते. अशा प्रकारची आणखी उत्पादने आम्ही लवकरच जारी करणार आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button