आरोग्य

लॉकडाउनच्या भीतीने मानसिक तणावात वाढण्याची भीती

सोशल मीडियावरील बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन

मुंबई – -कोरोनाचा संसर्ग मुंबईसकट महाराष्ट्रामध्ये वाढत असून मुख्य शहरांमध्ये नाईट कर्फ्यूला सुरुवात झाली असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी आठ दिवसाचा नागरिकांना अल्टिमेटम दिला असून नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाउन केले जाण्याचा इशारा दिला आहे. याचसोबतच सर्व धार्मिक, राजकीय सामाजिक यात्रा, आंदोलने व मोर्चे यावर बंधने घातली आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनमुळे संपूर्ण भारताची आर्थीक स्थिती बिघडलेली असून जर खरोखरच लॉकडाउन झाले तर नागरिकांच्या मानसिक ताणतणावात वाढ होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे एमडी मानसोपचार सल्लागार, डॉ. प्रतीक सुरंदशे सांगतात, ” कुठल्याही संसर्गजन्य आजारात तो पसरू नये यासाठी लॉकडाउन करणे गरजेचं असते . मात्र, या लॉकडाउन मध्ये मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण भारतातील ८० टक्क्याहून जास्त नागरिक हे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या व उद्योगधंद्यांवर अवलंबून आहेत त्यामुळे गेल्या लॉकडाउनमध्ये अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे अनेक नागरिक हे मानसिक तणावात आहेत गेल्या दोन महिन्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून अर्थव्यवस्था रुळावर येत होती परंतु गेल्या आठ दिवसात नागरिकांच्या चुकीमुळेच कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. आपल्याला लॉकडाउन थांबवायचे असेल तर शासनाने दिलेल्या नियमांचा काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आजही कोरोनाविषयी एकीकडे टोकाची बेफिकिरी आणि दुसरीकडे टोकाचा मानसिक ताणतणाव अशा विचित्र स्थिती समाजात दिसून येत आहे, त्यामुळे नियमित मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व वारंवार हात पाय धुणे ही त्रिसूत्री प्रत्येक नागरिकाने अवलंबली पाहिजे, यासोबतच सोशल मीडियावरील फेक बातम्या पाहणे व ऐकणे बंद केले पाहिजे.”

कौटूंबीक हिंसाचार व लॉकडाउन याविषयी अधिक माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मनोविकारतज्ञ डॉ ओंकार माटे सांगतात, ” समाजातील सर्वांत असुरक्षित मानले जाणारे घटक- स्त्रिया व मुले यांना कायमच अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, नुकत्याच एका सर्वेक्षणानुसार असे समोर आले की आणीबाणी, आर्थिक संकट, साथीचे रोग यांनी वेढलेल्या या टाळेबंदीच्या काळात स्त्रिया व लहान मुले यांच्यावरील हिंसाचाराचे प्रमाण दुपटी-तिपटीने वाढले आहे.भारतात, कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी या राष्ट्रीय महिला आयोगाकडे केल्या जातात. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ताज्या आकड्यांनुसार या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी सामान्य काळाच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत. कोरोनामुळे आलेली जागतिक मंदी, बंद पडलेले उद्योगधंदे, बेरोजगारी, पगारातील कपात, आर्थिक अडचणी, गरीबी, या सर्व संकटातून आपण सावरू की नाही याची भिती, दडपण, राग अशी अनेक कारणे कौटुंबिक हिंसाचार निर्माण करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button