लाईफस्टाईल

रीबॉकने चांगल्या जीवनशैलीसाठी आणली वॉकिंग उत्पादनांची श्रेणी

नवी दिल्ली : फिटनेस आणि शारीरिक हालचालींमुळे लोकांचे आयुष्य अधिक चांगले होईल यावर रीबॉक या भारतातील आघाडीच्या फिटनेस ब्रॅण्डचा विश्वास आहे आणि म्हणूनच स्वत:चे सर्वोत्तम स्वरूप समोर आणण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याकरिता रिबॉक वचनबद्ध आहे. आता तर तंदुरुस्त व निरोगी राहण्यास पूर्वी कधीही दिले जात नव्हते एवढे प्राधान्य दिले जाणार आहे आणि फिटनेस विभागात ग्राहकांना अधिकाधिक देण्याचे उद्दिष्ट रीबॉकने ठेवले आहे.


लोक तंदुरुस्त राहण्यासाठी चालण्याचा व्यायाम नियमित करत आहेत हे रीबॉकने गेल्या काही वर्षांत पाहिले आहे. जीवनशैलीमध्ये हा बदल करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रीबॉकने नवीन वॉकिंग रेंज आणली असून, याद्वारे सर्वांना उपलब्ध होऊ शकतील अशी दर्जेदार उत्पादने पुरवली जाणार आहेत. या विभागात पुरुष व स्त्रियांसाठी अनेक नव्याने आणलेली उत्पादने आहेत. कमाल आराम व सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने ही उत्पादने डिझाइन करण्यात आली आहेत.
रीबॉकच्या वॉकिंग रेंजला श्रेष्ठ दर्जा, आरामदायीपणा व तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे. रीबॉक एव्हर रोड डीएमएक्स, लीप स्लिप ऑन, एव्हाझ्युर डीएमएक्स लाइट, रीबॉक लाइट स्लिप आणि अर्डारा ३.० अशी नावे असलेली नवीन उत्पादने रीबॉकचे वॉकिंग विभागातील स्थान भक्कम करण्यास सज्ज आहेत. या श्रेणीद्वारे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत व श्रेष्ठ दर्जाचे शूज परवडण्याजोग्या दरश्रेणीत उपलब्ध होणार आहेत.
रीबॉकच्या ‘एव्हर रोड डीएमएक्स’ या वॉकिंग शूचे प्रगत व वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान मिडसोलमधून कोरलेल्या छोट्या पॉड्सवर आधारित आहे. त्याच आकाराचे पॉड्स आउटसोलमध्ये दाबून बसवले जातात. या पॉड्सचे भौमितिक आकार एकमेकांशी जुळल्यामुळे चालताना पावलांना जास्तीत-जास्त आधार पुरवला जातो. या पॉड्सना जोडणारे चॅनल्सही मिडसोलमधून कोरून काढलेले असतात आणि आउटसोलमध्ये ढकललेले असतात. शूजमध्ये अडकलेली हवा या चॅनल्समुळे पॉड्समध्ये फिरू शकते आणि टाचेपासून चवड्यापर्यंत संपूर्ण पावलासाठी नैसर्गिक कुशनिंग तयार होते. पर्यायाने चालण्याचा अनुभव अत्यंत आरामदायी होतो.
रीबॉकची ब्रॅण्ड अँबॅसडर मलाईका अरोरा या वॉकिंग रेंजबद्दल म्हणाली, “रीबॉक इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून माझा फिटनेस पार्टनर आहे. उत्कृष्ट वॉकिंग उत्पादनांची श्रेणी लाँच करण्यासाठी पुन्हा एकदा या ब्रॅण्डसोबत जोडले जाण्याहून अधिक आनंददायी दुसरे काही असूच शकत नाही. चालणे हा व्यायाम प्रत्येकजण दररोज करू शकतो आणि रीबॉक त्यांच्या श्रेणीद्वारे अत्यंत आरामदायी, दर्जेदार व परवडण्याजोगी उत्पादने पुरवत असेल तर देशभरातील अधिकाधिक लोकांना अधिक तंदुरुस्त, अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा मिळेल हे नक्की.”
नवीन वॉकिंग कॅटेगरीत समाविष्ट करण्यात आलेल्या काही उत्पादनांची माहिती पुढे दिली आहे:
● अर्डारा ३.० – ३,९९९ रुपये
● इव्हाझ्युर डीएमएक्स लाइट ३.० – ४,९९९ रुपये
● इनबाउंड स्लिप ऑन- २,७९९ रुपये
● लीप स्लिप ऑन- २,७९९ रुपये
● रीबॉक एव्हर रोड डीएमएक्स ३.० – ५,९९९ रुपये
● रीबॉक एव्हर रोड डीएमएक्स स्लिप ऑन ३ – ५,५९९ रुपये
● रीबॉक एव्हर रोड डीएमक्स स्लिप ऑन ४ – ५,५९९ रुपये
● रीबॉक लाइट स्लिप २.० – ३,५९९ रुपये

२,७९९/- रुपये किंमतीपासून सुरू होणारी ही उत्पादने पुरुष, स्त्रिया व युनिसेक्स सायजिंगमध्ये रीबॉक स्टोअर्समध्ये तसेच shop4reebok.com वर ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, अजिओ आणि टाटाक्लिक यांसारख्या अन्य फॅशन रिटेलर्सकडेही नवीन वॉकिंग उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button