राजकारण

बिगुल वाजला… देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान; पाचही राज्यांचा निकाल एकाच दिवशी २ मे रोजी जाहीर होणार

नवी दिल्ली : पश्चिम बंगालसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली आहे. पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे निवडणुका होणार असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाने दिल्ली स्थित विज्ञान भवनात पत्रकार परिषदेत घेत चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीची घोषणा केली आहे. पाचही राज्यांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर केला जाईल

यावेळी निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात पार पडलेल्या बिहार निवडणुका यशस्वी ठरल्या. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येत मतदान केले गेले आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्य तर पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 294 मतदार संघ आहेत. सर्वाधिक जास्त जागा पश्चिम बंगालमध्ये असल्याने भाजपनेही येथे सत्ता परिवर्तनासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणीवर भर दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, भाजपनेही येथे आव्हान उभे केले आहे. तमिळनाडूत 234 जांगासाठी तर केरळमध्ये140 जागांसाठी हे मतदान होत आहे. आसाम येथे 126 मतदार संघात निवडणूक होत आहे. पुडुचेरी या केंद्रशासिस प्रदेशात काँग्रेसला पायउत्तार व्हावे लागले आहे. याठिकाणीही आता निवडणूक होत आहे. या ठिकाणी 30 मतदार संघात निवडणूक होत आहे.

या निवडणुका कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना कोरोना नियमांचे पालन गरजेचे आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असेल. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. मतदानासाठी एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे. मतदारांच्या सोईसाठी तब्बल 2.7 लाख मतदान केंद्र असतील. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 18 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तसेच एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र हे तळ मजल्यावरच असेल, असे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली आहे. पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे निवडणुका होणार असल्याचे त्यांनी म्हटले. आज निवडणूक आयोगाने दिल्ली स्थित विज्ञान भवनात आज पत्रकार परिषदेत घेत चार राज्य आणि एक केंद्रशासिस प्रदेशात निवडणुकीची घोषणा केली आहे.

यावेळी निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, कोरोना संक्रमण काळात पार पडलेल्या बिहार निवडणुका यशस्वी ठरल्या. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येत मतदान केले गेले आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्य तर पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभा निवडणुकांसंंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पश्चिम बंगालमध्ये 294 मतदार संघ आहेत. सर्वाधिक जास्त जागा पश्चिम बंगालमध्ये असल्याने भाजपनेही येथे सत्ता परिवर्तनासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणीवर भर दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, भाजपनेही येथे आव्हान उभे केले आहे.
तमिळनाडूत 234 जांगासाठी तर केरळमध्ये140 जागांसाठी हे मतदान होत आहे. आसाम येथे 126 मतदार संघात निवडणूक होत आहे. पुडुचेरी या केंद्रशासिस प्रदेशात काँग्रेसला पायउत्तार व्हावे लागले आहे. याठिकाणीही आता निवडणूक होत आहे. या ठिकाणी 30 मतदार संघात निवडणूक होत आहे.

या निवडणुका कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना कोरोना नियमांचे पालन गरजेचे आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असेल. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. मतदानासाठी एका तासाची वेळ वाढविली जाणार आहे. मतदारांच्या सोईसाठी तब्बल 2.7 लाख मतदान केंद्र असतील. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 18 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तसेच एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होईल. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र हे तळ मजल्यावरच असेल, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान होणार.

– पहिला टप्पा : २७ मार्च रोजी मतदान पार पडेल
– दुसऱ्या टप्पा : १ एप्रिल रोजी मतदान होईल
– तिसरा टप्पा : ६ एप्रिल रोजी मतदान
– चौथा टप्पा : १० एप्रिल रोजी मतदान
– पाचवा टप्पा : १७ एप्रिल रोजी मतदान
– सहावा टप्पा : २२ एप्रिल रोजी मतदान
– सातवा टप्पा : २७ एप्रिल रोजी मतदान
– आठवा टप्पा : शेवटचा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडेल

पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक २०२१ :

– पुदुच्चेरीत ३० मतदारसंघात एकाच टप्प्यात म्हणजेच ६ एप्रिल रोजी मतदान पार पडेल

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ :

– तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. राज्यात ६ एप्रिल रोजी मतदान होील.

केरळ विधानसभा निवडणूक २०२१ :

– केरळमध्ये सर्व १४ जिल्ह्यांतील १४० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडेल.

आसाम विधानसभा निवडणूक २०२१ :

आसाममध्ये ३ टप्प्यांत निवडणूक
– पहिला टप्पा : ४७ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान
– दुसरा टप्पा : ४९ जागांसाठी १ एप्रिल रोजी मतदान
– तिसऱ्या टप्प्यासाठी ४० जागांवर ६ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं 200 जागांचे लक्ष्य
पश्चिम बंगालमध्ये आधीपासून निवडणुकीचे वारे वाहत आहे. आज निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरतील. सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी सरकार आहे. मात्र, यावेळी भाजपने 200 हून अधिक जागा आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मोठ मोठे मेळावे घेण्यात येत आहेत. याखेरीज डाव्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे बंगालचे राजकारण आणखी रंजक झाले आहे.

आसाममध्ये पुन्हा भाजप?
126 जागा असलेल्या आसाम राज्यात सध्या भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आहे. येथे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपने येथे 60 जागा जिंकल्या होत्या. यावेळी येथे काँग्रेसही विजयाचा दावा करीत आहे. परंतु, मागील निकाल पाहता काँग्रेस 122 जागा लढवून केवळ 26 जागा जिंकू शकली. येथे सरकार स्थापन करण्यासाठी 64 जागांची आवश्यकता आहे.

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके सत्ता राखणार?
तामिळनाडूमध्ये सत्तेत येण्यासाठी जादुई आकडा 118 आहे. सद्यस्थितीत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम (AIADMK) येथे सरकार चालवत असून पलानीस्वामी हे राज्याचे प्रमुख आहेत. मागील निवडणुकीत एआयएडीएमकेने 136 जागा जिंकल्या, तर मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने 89 जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा 188 जागा आहे.

केरळमध्ये सीपीआयचं काय होणार?
केरळमध्ये सध्या सीपीआयच्या नेतृत्वाखालील डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकार आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे सरकार चालवल आहेत. मागील निवडणुकीत एलडीएफला 91 आणि काँग्रेसच्या नेतृत्वात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 47 जागा मिळाल्या. येथे बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या तारखांपूर्वी राहुल गांधींनी येथे बऱ्याच जाहीर सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे भेट दिली आहे.

निवडणूक आयोगाने काय सांगितले?

– रोड शोमध्ये 5 गाड्यांनाच परवानगी, बंगालमध्ये दोन स्पेशल निरीक्षक, परीक्षा आणि सण-उत्सावांच्या दिवशी मतदान नाही.
– निवडणूक कर्मचाऱ्यांना कोरोना लस. मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करु
– विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांतील उमेदवारांना जास्तीत जास्त ३८ लाख रुपयांचा खर्च करता येईल तर पुदुच्चेरीच्या उमेदवारींना जास्तीत जास्त २२ लाखांचा खर्च करण्याची परवानगी असेल
– रॅलीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मैदानांवरच सभा होतील. पश्चिम बंगाल सहीत सर्वच राज्यांत सुरक्षा दल अगोदरच पाठवले जाणार आहेत
– निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना करोना नियमांचं पालन गरजेचं राहील. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी असेल.
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पडेल.

००००००००००००००००००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button