Uncategorized

कोरोनामुळे पश्चिम अन् मध्य रेल्वेच्या प्रवासीसंख्येत घट

मुंबई : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत मागील पाच दिवसांत एकूण २ लाखांनी घट झाली आहे.

काेरोना नियंत्रणात आल्याने मर्यादित वेळेत सर्वांना लोकल मुभा दिली. लोकल सुरू झाल्याने नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या १७,५९,१२३ इतकी होती. तर १९ तारखेला ती १६,८८,२६० पर्यंत खाली आली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारीच्या तुलनेत १९ फेब्रुवारीच्या प्रवासीसंख्येत एक ते दीड लाखांची घट झाली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारी रोजी २३,३९,१३१ अशी प्रवासीसंख्या होती, तर १९ फेब्रुवारीला ही प्रवासीसंख्या २० लाखांपर्यंत आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना सुरक्षित वावर नियमांचे पालन शक्य होत नाही. अनेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे प्रवाशांनी लोकल प्रवास टाळण्यास सुरुवात केली आहे. ज्यांना घराबाहेर पडल्याशिवाय कमाई करणे शक्य नाही, असा वर्ग जीव मुठीत घेऊन लोकल प्रवास करत असल्याचे रेल्वेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button