राजकारण

उद्धव ठाकरे थापा मारतात हे ठाऊक होतं, पण खोटं बोलतात हे आज पाहिलं : भातखळकर

मुंबई – राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे, यातच जर लोकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना विरोधकांसह सहकारी पक्षांचेही कान टोचले आहेत. लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर टीका करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं, आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते साफ खोटं आहे, आफ्रिकेतून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा अशा भाषेत त्यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण होते, लसीकरणात महाराष्ट्राचा नंबर देशात सर्वात शेवटचा का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, संचारबंदी आणि लॉकडाऊन असे इशारे देऊन काही फायदा होणार नाही, स्वतःच्या अपयशाबद्दल जनतेला दोष देऊ नका असा टोलाही अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button