राजकारण

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या मॉडेलचे अनुकरण करा; हायकोर्टाचे आदेश

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा सध्या नियंत्रणात येत आहे. मुंबईत कोरोना आकडेवारीत घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुंबईच्या कोरोना नियंत्रण कामाचं कौतुक केले होते. यानंतर आता मुंबई मॉडेल आसपासच्या महापालिकेत राबवा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.

मुंबई देशातील सर्वाधिक कोरोना संसर्ग असणाऱ्या शहरांपैकी एक होते. मात्र, मागील काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचा वेग मुंबईत मंदावलाय. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मुंबईचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. तर डेथ रेट ०.०४ टक्क्यापेक्षा कमी झाला आहे.

सध्या मुंबई माँडेल हे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आसपासच्या महापालिकेत हे मॉडेल राबवले पाहिजे. तसेच ठाणे, वसई-विरार, कल्याण, उल्हासनगर या भागातही मुंबई मॉडेल राबवण्यात यावे, अशी सूचना हायकोर्टाने महापालिका आणि राज्य सरकारला दिली आहे. यामुळे इतर भागातील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल, असे हायकोर्टाने सांगितले आहे.

कसे आहे मुंबई मॉडेल?

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी मुंबई महापालिकेने तातडीने ऑक्सिजनचं नियोजन केलं. पालिकेने ऑक्सिजन पुरवठा सिस्टिम वाढवली. २८ हजार बेड पैकी १२ ते १३ हजार बेडवर ऑक्सिजन सप्लाय करणअयाची व्यवस्था केली. त्यानंतर पालिकेने ऑक्सिजन सिलिंडरही बदलण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला पालिका साधारण ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होती. नंतर पालिकेने जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वार केला. साधारण ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा या सिलिंडरची क्षमता दहा टक्के अधिक असते. त्याचबरोबर पालिकेने १३ हजार किलो लीटरची मेडिकल ऑक्सिजन टँक तयार केली. त्यामुळे रुग्णालये रिफिल मोडवरून स्टोरेज सप्लाय मोडवर आले, असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

मुंबई मॉडेलमधील प्रमुख बाबी –

– ‘चेज द व्हायरस’ अंतर्गत घरोघर जाऊन चाचणी
– जंबो कोविड सेंटर्समध्ये ९,००० बेड्स, ५४०० बेड ऑक्‍सीजन युक्‍त
– खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड बीएमसीच्या नियंत्रणात
– कोविड व्हॅक्सिनेशनवर भर, मिशन झिरोची अंमलबजावणी
– बीएमसीच्या सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लँटची निर्मिती
– वेळेवर सेंट्रलाईज ऑक्सिजन सप्लायची व्यवस्था
– वार्ड वॉर रूमचा प्रभावी वापर, खासगी रुग्णालयांचाही उपयोग

कोरोना नियंत्रणासाठी बीएमसीने ‘वार्ड वॉर रूम’ तयार केली. याच्या माध्यमातून १०,००० रुग्णांचं व्यवस्थापन केलं जात आहे. कोविड जंबो सेंटरच्या माध्यमातून मुंबईत ९ हजार बेड तयार आहेत. यात ६० टक्के बेड्स ऑक्सिजन सुविधायुक्त आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेडही ताब्यात घेण्यात आलेत. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या उपचाराचे दर सरकारी दराप्रमाणे आहेत. या सर्व बेड्सचं व्यवस्थापन वॉर रूममधून केलं जातंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button