Top Newsराजकारण

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून लोकल सुरु : उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.

याचबरोबर, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा, अशे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची अट शिथिल करावी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जावून भेट घेतली होती. त्यांना आपल्या राज्याच्या काही गोष्टींबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती. या आपत्तीच्या वेळेला एनडीआरएफचे निकष बदलायला हवेत. मदत वाढवायला हवी, अशी विनंती केली होती. तसेच आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली होती. मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण यासाठी एम्पेरिकल डेटा मागविला आहे. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षण. आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही केंद्रालाच आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षण द्यावं किंवा ५० टक्क्यांचे अट शिथिल करुन राज्यांना आरक्षणाचे अधिकार द्यावे, अशी विनंती केली होती. केंद्र सरकार आता राज्य सरकारला याबबतचा अधिकार देणार आहे. तसेच ५० टक्क्यांच्या अट शिथिल करुन द्यावी. आम्ही ज्यांवा आवश्यक आहे त्यांना आरक्षण देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबतची अट काढतील, असा मला विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत जाहीर केली

मुख्यमंत्री आल्यानंतर एका पॅकेजची घोषणा करतात अशी परंपरा आहे. मी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पॅकेजची घोषणा करणार नाही पण सगळ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आजदेखील अनेक पालकमंत्री आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हजर आहेत. आम्ही एक आढावा घेतला की काय करता येईल? आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. तात्काळ मदत आणि लॉंगटर्म योजना करत आहोत. आपल्याला धोकादायक वस्त्यांचं पूनर्वसन करावं लागेल. तसेच पुराचं व्यवस्थापन करण्यासाठी दुरगामी योजना आखाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महापूर दरम्यान चार लाख नागरिकांचं स्थलांतर

ज्या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आपल्याला धडकलं. यावेळी तौत्के चक्रीवादळाने आपल्या किनाऱ्याला स्पर्श केला. त्याने करायचं तेवढं नुकसान केलंच. त्यानंतर जो काही पूर आला ते सगळं विचित्र होतं. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस एका दिवसात आणि काही तासात कोसळायला लागला. याची काही कारण आपण काहीह देऊ शकतो. वेधशाळेने याचा अपल्याला अंदाज दिला होता. पण तो इतक्या भीषण राहील असं कुणाला माहिती नव्हतं. काही ठिकाणी धरणाचं पाणी कमी करावं लागलं. त्यामुळे नद्यांना पूर आलं. आता हे दरवर्षाचं संकट त्यातून येणारी आपत्ती. त्यातल्या त्यात अतिवृष्टीचा इशारा सांगितल्यानंतर आपल्या प्रशासनाने जवळपास साजेचार लोकांचं स्थलांतर केलं. आपण जीवितहानी होऊ दिलं नाही. मात्र, ज्या दरडी कोसळल्या त्यात आपले रस्ते खचले. तसेच घाटही खचले. तसेच दरडी कोसळून गावचे गाव उद्धवस्त झाले. डोंगराच्या खाली आपले बांधव, मात-भगिनी गाडले गेले. दरडी कोसळणे, पूर येण्याचे प्रामाण लाढायला लागले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळणार आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल, असं म्हटलं जातंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांसह पुणे सोलापूर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांनादेखील कोरोनाचा धोका आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची दररोज नोंद होत आहे. येथील शहरं आणि ग्रामीण भागातील परिस्थितीत तफावत असू शकते. परंतु या जिल्ह्यांच्या प्रशासनाने आणि नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आपण ‘कोरोनामुक्त गाव’ यासारखे उपक्रम राबवतोय. मी, तसेच प्रशासन गावांमधील सरपंचांशी संपर्क करत आहोत. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे अनेक गावं कोरोनामुक्त झाली आहेत. अशाच पद्धतीने आपण कोरोनाला हद्दपार करण्यात यशस्वी होवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

पूर येण्याचं, दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे

पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या हवामान बदलाची माहिती दिली. ग्लोबल वार्मिंगमुळे बर्फ वितळत असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यात दरडी कोसळण्याचे तसेच पूर येण्याचे प्रमाण वाढत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं. हे दरवर्षीचं संकट आहे. पावसामुळे काही दरडी कोसळल्या. रस्ते खचून गेले. दरडीमध्ये रायगडमध्ये गावंच्या गावं दबले.तळीयेमध्ये मी गेले होतो. तिकडे सगळे चिखल साचलेला होता. यामध्ये मोठी जीवितहानी झाली. पूर येण्याचं, दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे, असं ठाकरे म्हणाले.

वेगळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन पुढे आलेलं संकट थोपवावं लागेल. नाहीतर असे संकटं भविष्यातही येत राहतील. सध्या आलेल्या पुरात २९ निवारा केंद्रांवर आपण ५० हजार नागरिकांची राहण्याची सोय केली होती. अशी संकटं पुन्हा पुन्हा येऊ नयेत त्यासाठी ज्या धोकादायक वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. ज्या गावांमध्ये पाणी घुसतं, तेथे व्यवस्थापन करण्यासाठी दूरगामी योजना आखावी लागेल. त्यासाठी सरकार पाऊल टाकत आहे. चिपळूण, महाडमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वातंत्र्य दिनाचा संघर्ष फक्त आठवायचा नाही, आता निश्चय करा

सात दिवसांनी आपला स्वातंत्र्य दिन येतोय. ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर एक इतिहास वाचत असताना त्यावेळच्या पिढीने कसं झोकून देऊन संघर्ष केलं, त्या काळच्या फक्त आठवणी काढून उपयोग नाही. आपल्याला कोरोना संकट जाईल असं वाटलं होतं. कमी-जास्त प्रमाणात लाटा धडकत आहेत. किती लाटा येतील याचा अजूनही अंदाज नाही. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. तो संघर्ष फक्त आठवायचा नाही तर आपणही आता निश्चय केला पाहिजे की, प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button