स्पोर्ट्स

राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून विजय

मुंबई : राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १३४ धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने १८.५ षटकांमध्ये ४ गडी गमावून पूर्ण केलं. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद ४२ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी २२ धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ गडी बाद केले. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा तळाला आठव्या स्थानावर होता. आजच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाला. राजस्थानने गुणतालिकेत आता सहावे स्थान पटकावले असून केकेआरचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने संयमी खेळी केली. संजूने ४१ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ४२धावा केल्या. संजू सॅमसनने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली. कोलकाताचा वानखेडे स्टेडियमवरील हा नववा पराभव ठरला आहे. कोलकाताने आतापर्यंत वानखेडेवर एकूण १० सामने खेळले आहेत. यापैकी केवळ १ सामन्यात कोलकाताचा विजय झाला, तर उर्वरित ९ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

केकेआरच्या १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग रताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली होती. पण यावेळी राजस्थानला मोठी सलामी मिळू शकली नाही. कारण केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने जोस बटलरला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. बटलर आऊट झाल्यावरही यशस्वी जैस्वाल हा धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात यशस्वीही बाद झाला. यशस्वीने यावेळी २२ धावा केल्या.

यशस्वी बाद झाल्यावर कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांची चांगली जोडी जमली. संजू यावेळी दमदार फलंदाजी करत होता आणि शिवम त्याला चांगली साथ देत होता. पण यावेळी गरज नसताना शिवम फटकेबाजी करायला गेला आणि ही जोडी मोडली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावा केल्या. दुबेने यावेळी १८ चेंडूंत २२ धावा केल्या. दुबे आऊट झाल्यावर राहुल तेवातिया फलंदाजीसाठी आला. पण यावेळी संजूसारखा स्थिरस्थावर झालेला फलंदाज समोर असताना तेवातिया आक्रमण करण्यासाठी गेला आणि बाद झाला. राहुलला यावेळी पाच धावांवर समाधान मानावे लागले.

तत्पूर्वी, केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. कारण केकेआरचा युवा सलामीवीर शुभमन गिल ११ धावांवर बाद झाला आणि त्यांना पहिला धक्का बसला. त्यावेळी केकेआरची अवस्था १ बाद २४ अशी होती. आतापर्यंत नितीष राणा हा चांगल्या फॉर्मात होता. पण आजच्या सामन्यात राणाला २२ धावांवर समाधान मानावे लागले. राणा बाद झाला असला तरी एकाबाजूने राहुल त्रिपाठी हा धावा जमवत होता. पण राहुलला यावेळी दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. राणा बाद झाल्यावर सुनिल नरिन हा फलंदाजीसाठी आला. नरिन मोठे फटकेबाजी करेल, असे वाटत होते. पण नरिनला यावेळी सहा धावांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन हा फलंदाजीसाठी आला. पण मॉर्गनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. मॉर्गन बाद झाल्यावर काही वेळातच केकेआरचा स्थिरस्थावर झालेला फलंदाज राहुलही बाद झाला आणि संघाला मोठा धक्का बसला. राहुलने यावेळी २६ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३६ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल हे फलंदाजी करत होते. रसेलला यावेळी फक्त ९ धावांवरच समाधान मानावे लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button