Uncategorized

मुंबई हायकोर्टात १० अतिरिक्त न्यायमूर्तींची नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ च्या कलम १ ने बहाल केलेल्या अधिकारांनुसार मुंबई मुंबई हायकोर्टाच्या दहा अतिरिक्त न्यायमूर्तींची पदोन्नती करून त्यांची न्यायमूर्ती म्हणून नेमणूक केली. न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे, न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सूर्यवंशी, न्यायमूर्ती अनिल सत्यविजय किलोर, न्यायमूर्ती मिलिंद नरेंद्र जाधव, न्यायमूर्ती मुकुंद गोविंदराव सेवाळीकर, न्यायमूर्ती वीरेंद्रसिंग ज्ञानसिंह बिष्ट, न्यायमूर्ती देवद्वर बालचंद्र उग्रसेना, न्यायमूर्ती सुरेंद्र बाळचंद्र, न्यायमूर्ती सुरिंदर पंढरीनाथ तावडे आणि न्यायमूर्ती रुद्रसेन बोरकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या दहा अतिरिक्त न्यायाधीशांची पदोन्नती करून त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक केली.

यासंदर्भातील अधिसूचना विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जारी केली. अतिरिक्त न्यायमूर्तीं हे सहसा दोन वर्षांसाठी नियुक्त केले जातात आणि त्यानंतर त्यांना कायम न्यायमूर्तीं म्हणून पदोन्नती दिली जाते. न्याय विभागाच्या वेबसाइटनुसार, मुंबई मुंबई हायकोर्टात एकूण न्यायमूर्तींची संख्या ९४ आहे, पण सध्या केवळ ६२ न्यायमूर्ती कार्यरत असून ३२ न्यायमूर्तींची कमतरता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button