इतर

महाराष्ट्रातील उर्वरित भागात जाणाऱ्या १९ रेलवे गाड्या रद्द

मुंबईः राज्यावर कोरोनाचं महाभयंकर संकट आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लादण्यात आलेत. जिल्हाबंदीही लादण्यात आली असून, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरण्यासही मज्जाव केलाय. याचा परिणाम रेल्वेवरही झालाय. प्रवाशांची संख्या कमी असल्यानं रेल्वेलाही अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्यात. कमी प्रतिसादामुळे/प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने गाड्यांचे रद्दीकरण विस्तारीत करण्यात आले आहे. ३० एप्रिल २०२१ पर्यंत रद्द असलेल्या खालील गाड्यांचे कमी प्रतिसादामुळे /प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने रद्दीकरण वाढविण्यात आलेय.

वास्तविक २६ एप्रिल २०२१ लाही रेल्वेच्या १० प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या या १० प्रवासी गाड्या १० मे पर्यंत रद्द करण्यात आल्यात.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे –

1) ट्रेन क्रमांक 02147 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 07.05.2021 पर्यंत रद्द

2) ट्रेन क्रमांक -02148 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 08.05.2021 पर्यंत रद्द

3) ट्रेन क्रमांक 01131 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

4) ट्रेन क्रमांक -01132 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

5) ट्रेन क्रमांक 01404 कोल्हापूर -नागपूर विशेषच्या फे-या दि. 26.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

6) ट्रेन क्रमांक 01403 नागपूर -कोल्हापूर विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

7) ट्रेन क्रमांक 02041 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

8) ट्रेन क्रमांक 02042 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

9) ट्रेन क्रमांक 02239 पुणे अजनी विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

10) ट्रेन क्रमांक 02240 अजनी -पुणे विशेषच्या फे-या दि. 02.05 .2021 पासून दि. 16.05.2021 पर्यंत रद्द

11) ट्रेन क्रमांक 02118 अमरावती -पुणे विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

12) ट्रेन क्रमांक 02117 पुणे -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द

13) ट्रेन क्रमांक 02036 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

14) ट्रेन क्रमांक 02035 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

15) ट्रेन क्रमांक 01137 नागपुर -अहमदाबाद विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द

16) ट्रेन क्रमांक 01138 अहमदाबाद -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

17) ट्रेन क्रमांक 02223 पुणे – अजनी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

18) ट्रेन क्रमांक 09125 सुरत अमरावती विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

19) ट्रेन क्रमांक 09126 अमरावती -सुरत विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button