आरोग्य

कोरोनाचा महाप्रकोप ! देशात दिवसभरात ३ लाख १५ हजार ४७८ नवीन रुग्ण, २१०१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता अतिशय झपाट्याने वाढत असल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. आता बुधवारी देशात कोरोनाचे ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसंच २१०० हून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या ७ दिवसांत देशात १८ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याच्या आधीच्या आठवड्यात ही संख्या १० लाखांहून अधिक होती. ही आकडेवारी वोर्लडोमीटर आणि कोविड १९ इंडिया ओआरजीवरून मिळाली आहे. गेल्या २४ तासांत ३ लाख १५ हजार ४७८ नवीन रुग्ण आढळून आले. १,७९,३७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर २१०१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

नवीन रुग्णांची भर पडल्याने देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही आता १ कोटी ५९ लाख २४ हजारांवर गेली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ४९ जण करोनातून बरे झाले आहेत. कोरोनाने १,८४, ६७२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २२ लाख ८४ हजार २०९ इतकी आहे. देशातील १४६ जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्गाचा वेग मोठा आहे. १५ टक्क्यांहून अधिक आहे. देश करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यात आहे, तरीही देशात करोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे करोना रुग्णांची संख्या कधी कमी होईल हे सांगणं कठीण झालं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button