कोरोना काळात नोकरी गमावणाऱ्यांचा पीएफ २०२२ पर्यंत केंद्र सरकार भरणार

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे नोकरी गमावलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने शनिवारी मोठी घोषणा केली. कोरोना महामारीमुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांचा पीएफ २०२२ पर्यंत सरकार भरणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की जे कर्मचारी ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत असतील त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळू शकेल.
निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, केंद्र सरकार नोकरी गमावलेल्यांना २०२२ पर्यंत कर्मचाऱ्यांचा पीएफ भाग जमा करणार आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांना छोट्या-मोठ्या नोकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुन्हा बोलावले, ज्या युनिट्सची ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना ही सुविधा दिली जाईल.
केंद्र सरकारने आत्मनिभर भारत रोजगार योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ३० जून २०२१ पर्यंत पीएफ भाग देण्याची घोषणा केली होती. ३० जून रोजी मर्यादा संपण्याच्या एक दिवस आधी २९ जून रोजी सरकारने या योजनेची अंतिम मुदत ३० जून ते पुढील वर्षी मार्च २०२२ पर्यंत वाढवली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा केली होती. ही योजना नोकरदार लोकांसाठी आहे, परंतु आज २१ ऑगस्ट रोजी अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की ज्या लोकांची नोकरी गेली आहे, परंतु ते कामावर परतले आहेत त्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल.




