आरोग्य

भारतीयांना लवकरच मॉडर्नाच्या लसीचा पर्याय

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. सध्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक ही लस दिली जात आहे. पण आता देशातील नागरिकांना आणखीन एक लसीचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच भारतामध्ये चौथ्या लसीचा डोस उपलब्ध होणार आहे. आज डीसीजीआय (Drugs Controller General of India) ने मॉडर्नाच्या कोरोना लसीच्या आयातीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी देखील मंजुरी मिळू शकते.

मुंबईत स्थित असलेल्या सिप्लाने मॉडर्ना लसीच्या आयात आणि मार्केट अथॉरायजेशनसाठी मंजुरीची मागणी केली होती. त्यानंतर डीसीजीआयने ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्ट १९४० अंतर्गत नवीन औषधं आणि क्लिनिकल परीक्षण नियम २०१९ च्या तरतुदीनुसार, सिप्लाला देशात आपात्कालीन वापराला मॉडर्ना कोरोना लस आयात करण्याची परवानगी दिली आहे.

डीसीजीआयने १ जूनला परदेशी लसींच्या नियम शिथल केले होते. डीसीजीआयने सांगितले होते की, जर कोणत्या लसीला अमेरिका, युरोप, यूके, जपान किंवा डब्ल्यूएचओकडून मंजुरी मिळाली आहे, तर भारतामध्ये ब्रीजिंग ट्रायल करण्याची गरज नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button