राजकारण

बारा आमदारांचा विषय हायकोर्टात; मुनगंटीवारांचा संजय राऊतांना चिमटा

चंद्रपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीला मंजुरी देत महाराष्ट्राला गोड भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. संजय राऊत यांच्या ट्विटवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील इतर महत्त्वाचे प्रश्न सोडून प्रत्येक वेळेस १२ आमदारांचा विषय अजेंड्यावर आणणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. हे नियुक्ती प्रकरण उच्च न्यायालयात असताना असे खुर्ची प्रेम सोडण्याचा चिमटा मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना घेतला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी कटुता संपवणे स्वागतार्ह विषय असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी नोंदविली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भेटीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्य प्रमुखांनी राज्यपालांना विविध विषयात मदत करणे अपेक्षित आहे. मात्र मागील काळात अनेक कटू विषय झाले. आता ते मागे पडून नवे वातावरण तयार होत असेल, अशी आशा त्यांनी बोलून दाखविली.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सामनातील लेखावर दिली आहे. शिवसेनेने कुणासोबतही जावं एमआयएम सोबतही जावं आमची काहीही हरकत नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन पक्षांनी विलीन होत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढावा असाही टोला त्यांनी लगावला. मात्र राज्यात जनहिताचे निर्णय न घेणारे सरकार टिकू शकणार नसल्याचे मत मात्र त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button