मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समितीच्या निवडणूक घेतल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम स्थगितीच्या टप्प्यावरून पुढे सुरू केला जाणार आहे.
१८ जुलैला होणाऱ्या या निवडणूक ९ जुलैला स्थगित करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार राज्य सरकार सोबत चर्चा करून तेव्हा निवडणूक आयोगाने या निवडणूक रद्द केल्या होत्या. आता लवकरच निवड करुन स्थगित कार्यक्रमावरून पुढे घेतल्या जाईल. शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे आदेश देताच निवडणूक आयोग सक्रिय झालं असून पुढच्या ३ ते ४ दिवसात स्थगित कार्यक्रम पुढे सुरू करण्याची घोषणा होऊ शकते.
कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचाच आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. त्यामुळे शनिवारी आलेल्या या निकालानंतर पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.