Top Newsराजकारण

ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात टाकणार का?; सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा. त्यांनाही उपचार मिळाला पाहिजे. तसं असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला. स्पर्धा चाललीये. जे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट केले आहेत. त्यात दाखल करणार का? हातपाय तोडले तरी किरीट सोमय्या लढत राहणार. राज्याला घोटाळेमुक्त करणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला. आतापर्यंत मला १४ नोटीसा आल्या. नोटीसा येणं आता नवं राहिलं नाही. सगळेच नोटीसा काढतात. नंतर हेच नोटीसा काढणारे तुरुंगात जातात, असा टोमणाही त्यांनी लगावाला.

दोन पोलीस हवालदारांना पुणे हल्ल्यांबद्दल निलंबित केलं, काय ऋडलं नाही तर का निलंबित केलं, एवढं का घाबरलात?, कोविड घोटाळा बाहेर येतोय त्यामुळे ठाकरे घाबरले आहेत. कोव्हिड घोटाळेबाजांना सजा होणार. तुम्ही ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपन्यांना टेंडर कसं दिलं? सजा होणारच, असं किरीट सोमय्या म्हणाले.

सुजित पाटकर आणि राजीव साळूंखेंचे काय संबंध आहेत हे संजय राऊतांच्या मुलींना सांगू द्या. संयुक्तपणे जमिनी खरेदी केल्या आहेत. राजीव साळुंखेंचं वार्षिक उत्पन्न ७० हजार आहे आणि त्यांना १०० कोटींचं टेंडर मिळालं. कोव्हिड घोटाळ्यांना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुजित पाटकर जबाबदार आहेत. ही कंपनी केव्हा तयार झाली, उलाढाल किती, स्टाफ किती, खोटे पुरावे सादर करून राज्यात लोकांची हत्या केली, अशी टीकाही त्यांनी केली.

यापूर्वीही सोमय्या यांनी या घोटाळ्यावरून आरोप केले होते. लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंट हे साळुंखे यांचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. ९ दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात ७ कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. ६५ कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता. तसेच साळुंखेंना पुण्यातील १०० कोटींच्या जम्बो कोव्हिड सेंटरचं कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button