Top Newsराजकारण

आता स्वस्थ बसणार नाही; नारायण राणेंचा ‘त्या’ मंत्र्यांना थेट इशारा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आज जोरदार हल्ला चढवला. अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणातही चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असंही राणेंनी म्हटलंय. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवला.

न्यायालयाच्या निर्णयानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. नारायण राणेंनी सुरुवातीलाच भाजप नेते आणि समर्थकांचे आभार मानले. भाजपा खंबीरपणे माझ्या पाठिशी उभी राहिली, असेही राणेंनी म्हटले. त्यानंतर, राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानांची उजळणी केली होती. त्यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांचे वाचन करुन दाखवले. त्यामध्ये, अमित शहांना निर्लज्जपणाने हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. त्यानंतर, रिअ‍ॅक्शन आली, शिवसेनेचे लोकं रस्त्यावर उभारले, एका ठिकाणी १७ जण होते, मी आवर्जून मोजले, असेही राणेंनी सांगितलं.

मी तुम्हाला घाबरत नाही, तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलोय. शिवसेना वाढविण्यात माझाही मोठा सहभाग आहे. तेव्हा, आत्ताचे कोणीही नव्हते, अपशब्द बोलणारेही नव्हते. म्हणून, त्यांना जे करायचंय ते करू देत. आपण सर्वांनी अनिल परब यांची रेकॉर्डींग पाहिली असेल. त्यात, ते पोलिसांना आदेश देत आहेत, असे म्हणत राणेंनी शिवसेना आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतात पकडा त्यांना, काही दरोडा घातलाय का? राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? दिशा सालियानच्या आत्महत्येत कोण मंत्री उपस्थित होतं? का त्याचा छडा लागला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय घडलं? कुठल्या मंत्र्याला अटक केली? आम्ही यापुढे कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यात जे जे होते ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही असंही सूचक इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्यच उरलं नाही. महिलांवर अत्याचार होत आहेत, व्यापाऱ्यांची दुकानं लुटली जात आहेत. बलात्कार करुन हत्या केल्या जात आहेत. दिशा सालियनचं कोणी केलं, कोण मंत्री आहेत? का त्याचा छडा लागत नाही. पूजा चव्हाण बाबतीत तेच घडलं. आत्ता गप्प बसणार नाही, काहीही होऊ दे… त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आम्ही पाठलाग करणार, असे म्हणत नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला थेट इशाराच दिला. तसेच, आम्ही लोकशाही मार्गाने, कायद्याने, न्यायालयात जाणार… बघुया कोण वाचवतं, असे राणेंनी म्हटलं. याप्रकरणात असलेल्यांना अटक होईपर्यंत गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेनेला थेट इशारा

आमच्या घरावर काल किती माणसं आली मोजली नाही. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केले. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत का? तुम्ही कुणीही माझं काही करू शकत नाही. तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलोय अशा संतप्त भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

मी असं काय बोललो ज्यानं राग आला. भूतकाळात एखादी गोष्ट घडल्यानंतर त्यावर गुन्हा कसा होतो? १ ऑगस्टला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं उद्घाटन होतं. शिवसेना नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? देशाबद्दल अभिमान आहे म्हणून ते संतापाने बोललो. शिवसेना भवनाबद्दल कुणी काही बोललं तर थोबाड फोडा हे आदेश नाहीत का? हा योगी आहे की ढोंगी, चप्पलाने मारले पाहिजे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चप्पलाने मारलं हे शब्द वापरलेले चालतात? केंद्रीय मंत्री अमित शाह यांना निर्लज्ज असा शब्द वापरला ते चालतं का? असा सवाल त्यांनी विचारला.

जनआशीर्वाद यात्रा यापुढेही सुरू राहील

गेल्या काही दिवसांपासून माझी जनआशीर्वाद यात्रा सुरु होती. काहीजण माझ्या मैत्रीचा फायदा उचलतात हेदेखील माझ्या लक्षात आलं आहे. ही जनआशीर्वाद यात्रा पंतप्रधानांना ७ वर्ष झाली. या कालावधीत केंद्राने आणलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणं यासाठी ही यात्रा काढली होती. देशाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. सर्व नवनियुक्त मंत्र्यांना राज्यात जाऊन जनतेची आशीर्वाद मागून खात्यातील कामकाजाला सुरुवात करा अशी सूचना पंतप्रधानांनी दिली होती. १९ ऑगस्टपासून माझ्या जनआशीर्वादाला यात्रेला सुरुवात झाली. दोन दिवस खंड पडला आहे. पुन्हा जनआशीर्वाद यात्रा पुढे सुरुच राहील असं राणेंनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button