फोन टॅप करण्याचा अधिकार फडणवीस आणि रश्मी शुक्लांना कोणी दिला?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल
सांगली : राज्यातील पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या गोष्टीची कल्पना पोलीस महासंचालकांना दिली होती. त्यानंतर महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून संशयितांच्या कॉल इंरसेप्शनची परवानगी मागितली होती. या रॅकेटसंदर्भात महासंचालकांनी एक अहवाल तयार केला होता, असा दावा फडणवीसांनी केला. याविषयी बोलताना जयंत पाटील यांनी फडणवीसांना रोखठोक सवाल केला. “जेव्हा देशाची सुरक्षितता धोक्यात असेल किंवा एखादा गुन्हा उघडकीस केला जात असेल तेंव्हा लोकांचे फोन टॅप केले जातात. संकेत पायदळी तुडवून कोणाच्या आदेशाने लोकांच्या कॉलचे रेकॉर्डिंग केले? लोकांचं संभाषण टॅप करण्याचा हा अधिकार यांना कोणी दिला?,” असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
पोलीस दलातील बदल्यांसाठीच्या कथित रॅकेटचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यांतर राज्यात खळबळ उडाली आहे. राज्य सरकार आणि पोलीस दलातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री जंयत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. राज्यातील जनता जास्त भीक घालणार नासल्याचं त्यांनी म्हटंलय. तसेच, राज्यातील सगळ्या बदल्या या अस्थापना बोर्डाने केल्या आहेत. तो अहवाल चुकलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती ही धादांत चुकीची आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या महिला पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचा अधिकार कोण दिला?. शुक्ला यांनी केवळ गृहमंत्र्यांवर वॉच ठेवण्याचं काम केलं, असे जयंत पाटील म्हणाले. रश्मी शुक्ला अधिकारी असताना त्यांनी काय काय माहिती गोळा केली याची तपासणी होणे गरजेचे असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या वेळी किती बदल्या झाल्या याचाही खुलासा होणे गरजेचे असल्याचे म्हणत फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.