राजकारण

महाराष्ट्र नशामुक्त करताना त्याची सुरुवात ‘कलानगरातून’ करा; नितेश राणे यांचा पलटवार

मुंबई : मुंबईतील माहीमध्ये काल भाजपा विधासभा कार्यलायाबाहेर झालेल्या पक्षाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. तर याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तर, भाजपा आमदारांच्या या टीकेला आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यांनी भाजपा आमदार नितेश राणेंवर निशाणा साधल्यानंतर आता नितेश राणेंनी देखील त्यांच्यावर थेट पलटवार केला आहे.

“एकदम बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे.. पण..त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या “कलानगरातून” करा..जेणेकरून रोज संध्याकाळी दिनोच्या घरी होणारे कार्यक्रम एकदाचेच संपतील..!!!” असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

तसेच, “नशामुक्त महाराष्ट्र बरोबर “महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र” हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे..जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर सारख्या महिलांना न्याय भेटेल! बरोबर ना राऊत साहेब?” असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे.

“शिवसेना भवन हे आता कलेक्शन सेंटर झाले आहे”, अशी टीका नितेश राणेंनी काल केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी आज सकाळी संजय राऊतांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी “काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागली असेल, असं मी वाचलं कुठेतरी. या सगळ्या विषयांवर आम्ही बोलण्यापेक्षा आमचे स्थानिक शाखाप्रमुख बोलतील. हा शाखाप्रमुखांच्या स्तरावरचा विषय आहे. कोण आहेत नितेश राणे? सोडून द्या”, अशा खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button