राजकारण

अमृता फडणवीसांकडून ठाकरे सरकारच्या कडक निर्बंधांचे स्वागत

मुंबईः महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू झालेत. या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, २२ एप्रिल म्हणजेच आज रात्री आठ पासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहेत. लॉकडाऊनबाबत राजकीय नेत्यांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विशेष म्हणजे नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी या लॉकडाऊनचे समर्थन केले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनचं समर्थन करताना ठाकरे सरकारला काही सल्लेही दिलेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय, तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजेत, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ठाकरे सरकारला हाच सल्ला दिला होता. लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रुग्णांची परवड थांबेल”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

त्याचबरोबर “कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे”, असंही फडणवीसांनी म्हटलं होतं.

Related Articles

One Comment

  1. I am also of the opinion that, to combat & control the current Pandemic of Covid, complete lockdown is only the solution. Night curfews & partial remedies are not sufficient at all to address this problem. There are several factors influencing human behaviour. Neither Govt nor people can be blamed for the sudden surge in Covid cases. The solution is “Only & Only Total Lockdown”, like last year.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button