वॉट-अ-बर्गरचे महाराष्ट्र व कर्नाटकमधील विस्ताराचे नियोजन
नवीन आर्थिक वर्षामध्ये ४० नवीन आउटलेटस सुरू करण्याचे उद्दिष्ट
मुंबई : डायनॅमिक बर्गर जॉईंटसची चेन असलेल्या वॉट-अ-बर्गरने आर्थिक वर्ष २१-२२ मधील योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र व कर्नाटकमधील विस्ताराला गती देण्याचे ठरवले आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत ४० नवीन आउटलेटस सुरू करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे व त्यापैकी बहुतांश ही बिहार, तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू व कर्नाटकामध्ये असतील.
भारतातील ९ राज्यांमधील १६ शहरांमध्ये वॅट-अ-बर्गरची आउटलेटस आधीच आहेत व दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, गुडगांव, नॉयडा, गाझियाबाद, वडोदरा, अहमदाबाद, सूरत, पंचकुला, गुवाहाटी, लखनौ, चंडीगढ़, गोरखपूर, फरीदाबाद, रांची, झांसी अशा सर्व महत्त्वाच्या जागी ती आहेत. ३१ पेक्षा जास्त आउटलेटससह बर्गर चेनने दिल्ली एनसीआरमधील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. त्याच प्रकारे ते आता महाराष्ट्र व कर्नाटकमधील आपली उपस्थिती वाढवू इच्छित आहेत.
महामारीने निश्चितच रेस्टॉरंट उद्योगावर मोठा आघात केला. रेस्टॉरंटस आणि कॅफेजची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणात बंदही होताना दिसले व कर्नाटक आणि महाराष्ट्र ही ती राज्ये होती. ह्या दोन राज्यांनीच सुरुवातीला क्युएसआर संस्कृतीचे मनापासून स्वागत केले होते आता ह्या दोन राज्यांमध्ये एफ अँड बी मार्केटमध्ये महामारीनंतर थोडी जागा मोकळी झाली आहे. म्हणून, महामारीनंतर ह्या राज्यांमध्ये आम्हांला मोठी संधी दिसते आहे, असे वॉट-अ-बर्गरचे सहसंस्थापक व सीईओ फारमॅन बीईंग ह्यांनी म्हटले आहे.