Top Newsशिक्षण

यूपीएससीकडून २०२२ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी upsc.gov.in ला भेट देऊन वेळापत्रक पाहावं. २०२२ मधील यूपीएससीच्या परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होतील.

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०२२ च्या सर्व परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतील. २०२१ मध्येही काही परिक्षांचं नोटिफिकेशन जारी केलं जाणार आहे. अभियांत्रिकी सेवा २०२२, संयुक्त जीईओ सायंटिस्ट सारख्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश असेल. या परीक्षांची अधिसूचना २२ सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. CISC परीक्षा २०२२ चे वेळापत्रक १ डिसेंबर रोजी जारी केले जाईल.

– परीक्षांचं वेळापत्रक पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in वर भेट द्या.

– वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर Whats New वर क्लिक करा.

– यापुढे परीक्षा लिंकवर क्लिक करा

– यापुढे कॅलेंडरवर क्लिक करा.

– यानंतर वार्षिक कॅलेंडर २०२२ च्या लिंकवर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर कॅलेंडरचे PDF ओपन होईल.

थेट लिंकवरून कॅलेंडर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

परीक्षेच्या तारखा

– अभियांत्रिकी सेवा (प्रारंभिक) परीक्षा २०२२ / एकत्रित भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा २०२२: २० फेब्रुवारी २०२२
– CISF AC (EXE) LDCE-२०२२: १३ मार्च २०२२
– NDA आणि NA परीक्षा (I), २०२२/ CDS परीक्षा (I), २०२२: ४ एप्रिल २०२२
– नागरी सेवा (प्रारंभिक) परीक्षा, २०२२ / भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, २०२२, CS (P) परीक्षा २०२२: ५ जून २०२२
– IES/ISS परीक्षा, २०२२: २४ जून २०२२
– एकत्रित भू-वैज्ञानिक (पुरुष) परीक्षा, २०२२: २५ जून २०२२
– अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा, २०२२: २६ जून २०२२
– एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, २०२२: १७ जुलै २०२२
– केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा २०२२: ७ ऑगस्ट २०२२
– NDA आणि NA परीक्षा (II), २०२२ / CDS परीक्षा (II), २०२२: ४ सप्टेंबर २०२२
– नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२२: १६ सप्टेंबर २०२२
– भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२२: २० नोव्हेंबर २०२२
– SO/स्टेनो (GD-B/GD-I) LDCE: १० डिसेंबर २०२२
– UPSC RT/परीक्षा: १८ डिसेंबर २०२२

परीक्षांच्या तारखा बदल शक्य

यूपीएससीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये परीक्षेच्या तारखांमध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात, असं सांगण्यात आलं आहे. कॅलेंडरनुसार, NDA आणि CDS दोन्ही परीक्षा १० एप्रिल रोजी एकाच दिवशी घेण्यात येतील. त्याची दुसरी लेखी परीक्षा ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर अधिक माहिती आणि नव्या अपडेटस उपलब्ध होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button