राष्ट्रवादीचे आ. अण्णा बनसोडे गोळीबारातून बचावले
पुणे: पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे. ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही.
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही जखम झालेली नाही. अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लाव म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला. मात्र, या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर येईल, असं अण्णा बनसोडे म्हणाले. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती आहे.