आरोग्य

केंद्र सरकारकडून कोरोना उपचाराच्या नव्या गाईडलाईन जाहीर

नवी दिल्ली : देशातील नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा आता लाखावर आला आहे. दुसरी लाट कमी होऊ लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जाहीर केली आहे. या आधी कोरोना उपचारासाठी जे उपाय केले जात होते, जी औषधे दिली जात होती ती हटविण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे वाफ घेणे, व्हिटॅमिनची गोळी खाणे आदी गोष्टी यामध्ये आहेत.

कोरोना रुग्णांनी काय करावे याबाबत नव्याने मार्गदर्शन केले आहे. नव्या गाईडलाईननुसार पुढील गोष्टी कराव्यात : वाफ घ्यायची नाहीय. कोणतेही अँटीबायोटीक घ्यायचे नाही. कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घ्यायची नाहीय. आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाहीय. Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करायचा नाही. ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही.

ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. यात पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button