आरोग्य

‘होम आयसोलेशन’साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर

नवी दिल्ली : ‘कोविड १९’च्या हलकी लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना ‘होम आयसोलेशन’साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

सुधारीत गाईडलाईन्समध्ये होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याचा किंवा टोचून घेण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. केवळ रुग्णालयातच रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाऊ शकतात, असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय.

हलकी लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना ‘स्टेरॉईड’ दिले जाऊ नयेत तसंच सात दिवसानंतरही लक्षणं कायम राहिली (ताप, सर्दी, खोकला इत्यादी) तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमी तीव्रतेची ‘ओरल स्टेरॉईड’ वापरता येऊ शकतील, असंही या गाईडलाईन्समध्ये म्हटलं गेलंय.

नव्या गाईडलाईन्सनुसार, ६० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांनी किंवा हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचा आजार असणाऱ्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं होम आयसोलेशनमध्ये राहावं.

ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी कमी झाल्यास किंवा श्वासोच्छवासात अडथळे जाणवल्यास रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊन डॉक्टरांकडून त्वरीत सल्ला घ्यायला हवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button