भाजप आ. प्रसाद लाड यांच्या घराबाहेर दोन बंदूकधारी तरुणांना अटक
मुंबई : भाजप आ. आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या मुंबईतील घराजवळ दोन अज्ञात तरुणांना अटक करण्यात आली आहे. या तरुणांकडे ३ मोबाईल आणि बंदूक सापडली आहे. पोलिसांनी बंदूक ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्रात अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांना यापूर्वी धमकीचे फोन आले आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांना काही दिवसांपुर्वी कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घराजवळच बंदूकधारी तरुण सापडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसाद लाड राजकारणात सक्रिय असून त्यांची शैली आक्रमक नाही. लाड शांत स्वभावाचे असले तरी एखाद्या विषयावरुन ते राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीका करत असतात. यापूर्वी भाजप आमदार आशिष शेलार यांनाही धमकीचे फोन आले आहेत. तसेच राज्य सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही धमकी देण्यात आली आहे. आमदार प्रसाद लाड यांच्या घराजवळ थेट तरुणांकडे बंदूकच सापडली आहे.
आमदार प्रसाद लाड यांच्या मुंबईतील घराजवळ दोन संशयित तरुणांना अटक ताब्यात घेतलं आहे. दोन्ही संशयित तरुणांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. यांच्याकडे ३ मोबाईल आणि बंदूक सापडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ही बंदूक सापडली आहे. त्यातील एका तरुणाचे आधारकार्डसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहे. आधारकार्डवर तरुणाचे नाव मिठ्ठू असे आहे. तसेच हा तरुण उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. तरुणांकडे बंदूक कशा आल्या याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.
शस्त्रधारी तरुणांना पोलिसांनी आमदाराच्या घराबाहेरुन ताब्यात घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार , खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना धमकीचे फोन आले आहेत. परंतु आता नेत्यांच्या घराबाहेरच शस्त्रधारी तरुण सापडत असल्याचे प्रकरण गंभीर आहे.