राजकारण

ठाणे जिल्ह्यातील दोन टोल नाके बंद; शिवसेना-मनसेत श्रेयवादाची लढाई

ठाणे : कल्याण-शिळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका असून तो इगल इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीद्वारे चालविण्यात येत होता. यापूर्वी हलक्या वाहनांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली होती. त्यानंतर या टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जात होता. परंतु, खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करीत होती. त्यास अखेर यश मिळाले आहे. याशिवाय कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव टोल नाकाही गुरुवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे.

टोलनाका बंद करण्यावरुन शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. वाहतुकीसाठी अडथळा असलेल्या काटई टोलनाका बंद केल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर कंत्राट संपल्याने हा टोलनाका बंद करण्यात आला आहे. याचे श्रेय घेण्याची गरज नाही, असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांना लगावला आहे.

सद्यस्थितीत कल्याण – शिळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम उत्तम गतीने सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणे व महामार्गावर जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग असून मध्येच टोलनाक्यावरही अवजड वाहनांना थांबा मिळत असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येते. निळजे येथील धोकादायक असलेल्या उड्डाणपुलाची डागडुजी करून तोही अवजड वाहनांना करता खुला करण्यात आला आहे. काटई येथील टोल बंद करून तेथील टोल बूथ सुद्धा तेथून काढून टाकण्यात यावेत जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button