Top Newsराजकारण

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात सिल्व्हर ओकवर तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार आणि आमदार रोहित पवार पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देशातील यूपीएचं नेतृत्व, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर उभं करण्याचं आव्हान आणि यूपीए – २ बाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी पोहोचले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. या भेट राजकीय नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटणार म्हणजे कुठल्या तरी निवडणुकांचीच तयारी असणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटत आहेत. त्यामुळे या भेटीची मोठी उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button