आरोग्य

नियंत्रित एचआयव्हीग्रस्तांचा दुर्मिळ समुहापासून मिळेल विकार बरा करू शकणाऱ्या उपचारांची गुरूकिल्ली

अ‍ॅबॉटच्या संशोधकांचे मोठे यश

मुंबई : वैज्ञानिकांच्या पथकाला, एचआयव्ही अँटिबॉडीजची टेस्ट पॉझिटिव असूनही अँटि-रिट्रोव्हायरल उपचार न देताही विषाणू भाराचे मापन कमी ते न सापडण्याजोगे आहे अशा व्यक्ती, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये (डीआरसी) खूपच मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत, असे अ‍ॅबॉटने जाहीर केले.
या व्यक्तींचा उल्लेख एचआयव्ही एलीट कंट्रोलर्स असा केला जात आहे. ही चाकोरीबाह्य संशोधने आज इबायोमेडिसनमध्ये (‘द लॅन्सेट’चा भाग) प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामुळे संशोधकांना लोकसंख्येतील जीवशास्त्रीय प्रवाह शोधण्यात मदत होऊ शकेल आणि यामुळे एचआयव्ही उपचारांमध्ये प्रगती होऊ शकेल, कदाचित लस विकसित करण्याच्या दिशेनेही प्रगती होऊ शकेल.

अ‍ॅबॉट, जॉन्स हॉपकिन्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसीजेस, युनिव्हर्सिटी ऑफ मिसौरी- कन्सास सिटी आणि युनिवर्सिते प्रोतेस्टान्त औ काँगो यांच्या संशोधनात असे लक्षात आले की, डीआरसीमध्ये एचआयव्ही एलीट कंट्रोलर्सचे प्रचलन (प्रिव्हेलन्स) २.७-४.३ टक्के आहे. त्यांचे जगभरातील प्रचलन ०.१-२ टक्के आहे. हा अनन्यसाधारण प्रतिक्षम (इम्युन) प्रतिसाद समजून घेण्यासाठी अतिरिक्त अभ्यासांना हे नवीन संशोधन चालना देईल. नैसर्गिक विषाणू दमन व भविष्यकालीन उपचार यांच्यातील दुवे प्रकाशात आणून एचआयव्ही साथ संपवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्यात संशोधकांना ही संशोधने मदत करू शकतील.

“एचआयव्ही ही एक आयुष्यभराची, जुनाट अवस्था आहे आणि काळाच्या ओघात ती सहसा वाढत जाते हे लक्षात घेता डीआरसीमध्ये एचआयव्ही एलीट कंट्रोलर्सचा मोठा समूह सापडणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर ग्लोबल हेल्थचे संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ्सच्या इंटरनॅशनल एचआयव्ही/एड्स रिसर्च विभागाचे प्रमुख तसेच या संशोधन अहवालाच्या लेखकांपैकी एक असलेले टॉम क्विन (एमडी) म्हणाले. “व्यक्तींमध्ये प्रादुर्भाव होऊनही तो वाढत नाही अशी उदाहरणे या अभ्यासापूर्वी क्वचित आढळली होती पण ही उच्च वारंवारता नेहमीपेक्षा वेगळी आहे आणि डीआरसीमध्ये यादृच्छिक (रॅण्डम) नाही असे काहीतरी रोचक शरीरशास्त्रीय स्तरावर घडत आहे हे यातून सूचित होते.”

जागतिक एड्स साथीला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत ७६ दशलक्ष लोकांना एचआयव्हीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि आज ३८ दशलक्ष लोक या विषाणूसह जगत आहेत. तीस वर्षांपूर्वी एचआयव्हीसाठी मंजुरीप्राप्त एफडीए चाचणी विकसित करणारी पहिली कंपनी म्हणून अ‍ॅबॉटला एचआयव्ही संशोधनाचे महत्त्व समजते आणि म्हणूनच कंपनीने निदानात्मक चाचण्या अद्ययावत राखण्याच्या उद्देशाने एचआयव्ही आणि हेपॅटायटिस म्युटेशन्स ओळखण्यासाठी ग्लोबल व्हायरल सर्व्हायलन्स प्रोग्राम प्रस्थापित केला. एचआयव्ही साथीचा उगम आफ्रिकेतील उपसहारा प्रदेशात आढळला असल्याने वैज्ञानिकांना या प्रदेशात विशेष रस आहे. अ‍ॅबॉट संशोधक तसेच सहयोगींची ही नवीन संशोधने विषाणू शोधाच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. याच प्रयत्नांतून २०१९ मध्ये एचआयव्हीचा (HIV in 2019) नवीन स्ट्रेन समोर आला होता.

“जागतिक स्तरावर देखरेख ठेवण्याच्या कामामुळे आपण उगवत्या प्रादुर्भावजन्य आजारांच्या पुढे राहू शकतो आणि या संशोधनातून आपल्याला एचआयव्ही बरा करण्यासाठीच्या उपचारांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात मदत मिळेल असे काहीतरी सापडले आहे,” असे अ‍ॅबॉटमधील प्रादुर्भावजन्य विकार संशोधनातील असोसिएट रिसर्च फेलो तसेच या अभ्यासाचे प्रमुख लेखक मायकेल बर्ग (पीएचडी) म्हणाले. “जागतिक संशोधक समूहापुढे आणखी बरेच काम आहे. मात्र, या अभ्यासातून आमच्या हाती जे लागले आहे त्याची जोपासना करणे व अन्य संशोधकांना याबद्दल माहिती देणे यामुळे एचआयव्हीचे निर्मूलन करू शकेल अशा संभाव्य नवीन उपचारांच्या अधिक निकट आम्ही पोहोचू शकतो. “

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button