Top Newsइतर

तौक्ते चक्रीवादळाचा वेग मंदावला, तरीही अतिवृष्टीचे सावट कायम

मुंबई : तौक्ते चक्रीवादळ गुजरातकडे सरकल्यानंतरही मुंबईत मंगळवारी अतिवृष्टीची शक्यता आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांसह आजुबाजूच्या परिसरातील आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरीही बरसत आहेत. याशिवाय, वारेही नेहमीपेक्षा वेगाने वाहत आहेत. वातावरणाचा एकूणच नूर पाहता मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाची तीव्रता ही कमी झाली आहे. पण मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईवरील धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी १२० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. खरंतर, कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांचं, घरांचं आणि गाड्यांचं नुकसान झालं आहे.

सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचं रौद्र रूप मुंबईने पाहिलं. संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेने १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.

मुंबईत महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय सायन, बिंदुमाधव ठाकरे जंक्शन वरळी, पठ्ठे बापुराव मार्ग ग्रँटरोड, चंदन स्ट्रीज मशीद बंदर रोड, चिराबाजार, शंकर बारी लेन, ५६ मोदी स्ट्रीट कुलाबा, जेजे रोड जंक्शन, बीडीडी चाळ अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सबवे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सबवे, लोखंडवाला लेन अंधेरी, मालवणी गेट नं. ६, योगीनगर बोरीवली, यशवंत नगर वाकोला या ठिकाणी पाणी भरले होते.

मुंबईत ४७९ झाडे कोसळली

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने सोमवारी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी पहाटेपासूनच मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढला आणि पावसाचा जोरही वाढला. दुपारी कुलाबा भागात वाऱ्याचा वेग ताशी ११४ किलोमीटरपर्यंत पोहचला होता. या वादळाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. शहर आणि उपनगरात ४७९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. त्याचवेळी २६ ठिकाणी घरे तसेच घराच्या भिंतीचा भाग कोसळला तर काही सखल भागांत पाणीही भरले. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी १२० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे.
तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रूप मुंबईने पाहिलं. आज संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेने १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
मुंबईत महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय सायन, बिंदुमाधव ठाकरे जंक्शन वरळी, पठ्ठे बापुराव मार्ग ग्रँटरोड, चंदन स्ट्रीज मशीद बंदर रोड, चिराबाजार, शंकर बारी लेन, ५६ मोदी स्ट्रीट कुलाबा, जेजे रोड जंक्शन, बीडीडी चाळ अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सबवे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सबवे, लोखंडवाला लेन अंधेरी, मालवणी गेट नं. ६, योगीनगर बोरीवली, यशवंत नगर वाकोला या ठिकाणी पाणी भरले होते.

चेंबूर सुमननगर येथे घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंतीचा भाग कोसळून ४ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आश्रय माळी, सुदर्शन माळी, आकाश माळी, सागर हनुमान अशी जखमींची नावे आहेत. बोरीवलीत काजूपाडा भागात क्रेनचा भाग घरावर पडून त्यात कुंदा सकपाळ, सागर सकपाळ, देवयानी सकपाळ असे तीन जण जखमी झाले. अंधेरीतील गणेशनगर सोसायटी येथे घराचा भाग कोसळून त्यात एक महिला जखमी झाली. मढ जेट्टी येथे बोट फुटून त्यातील ५ जण बुडाले होते. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले असून एक जण बेपत्ता आहे. समुद्र खवळलेला असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. माहीम कॉजवेच्या मागे रेती बंदर येथे एका बोटीचा अँकर तुटून बोट समुद्रात गेली. या बोटीतील ५ जण बुडाले होते. त्यातील दोन जण पोहून किनारी आले आहेत. एक जण बुडाल्याची शक्यता आहे तर अन्य दोघे सुखरूप असावेत अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

आकाशात काळ्या ढगांची गर्दी

तौक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी दिवसभर मुंबई, उपनगर आणि ठाण्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला होता. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. मंगळवारीही अशाचप्रकारेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दादर टीटी परिसरात मंगळवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. आजही दक्षिण मुंबई मुसळधार पाऊस झाल्यास हा परिसर पूर्णपणे जलमय होण्याची शक्यता आहे.

वसई-विरार आणि नालासोपऱ्यात जोरदार पाऊस

वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. काल दिवसभरात चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. परिणामी अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सलग पावसाने शहरातील अनेक सखल भागांत दोन फूट पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नालासोपारा निलेमोरे गाव, वसई समता नगर, नवजीवन, सतीवली, विरार विवा कॉलेज रोड यासह अन्य भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button