राजकारण

फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ठाकरे सरकार चालेल : रामदास आठवले

इंदापूर (पुणे) : जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तोपर्यंत ठाकरे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते इंदापूर इथे बोलत होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्यादरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. हे सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न पत्रकारांनी रामदास आठवले यांना विचारला. त्यावर रामदास आठवले म्हणाले, हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल. सचिन वाझे (प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे असं, रामदास आठवले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button