एकीकडे भारत जागतिक शाततेसाठी आग्रही असताना दुसरीकडे बांगलादेश मधील कट्टर दहशतवादी संघटनांनी हिंदू मंदिरांना लक्ष करत हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड केली. भारत आणि बांगलादेश यांना जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे; अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थता नको आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यात शनिवारी( २७ मार्च) केले.मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यावर तेथील करत वाद्यांनी तीव्र आक्षेप नोंदवीत व् हिंदू मंदिरांना लक्ष करत संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे बांगलादेशच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दोन दिवसीय दौरा केला होता. मात्र, त्यांच्या दौऱ्यानंतर कट्टरतावादी आणि धर्मांध इस्लामिक गटांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. बांगलादेशमध्ये रविवारी (२८ मार्च ) एका ट्रेनलाही लक्ष्य करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी पुन्हा परतल्यानंतर हे हल्ले झाले .रायटर्स वृत्तसंस्थेने पोलीस आणि स्थानिक पत्रकाराच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याविरोधात झालेल्या आंदोलनात काही आंदोलकांचा मृत्यू झाला. या घटनेच्याविरोधात बांगलादेशमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा संपल्यानंतर कट्टरतावादी इस्लामिक गटांच्या आंदोलनात पोलिसांसोबत झालेल्या हिंसाचारात किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांच्या मृत्यूमुळे बांगलादेश पुन्हा आंदोलन पेटले आहे. बांगलादेश स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी हे भारतातील मुस्लिमांविरोधात असून त्यांच्याशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांच्या दौऱ्याला काही कट्टरतावादी संघटनांनी विरोध केला होता.
शनिवारी, ( २७ मार्च ) चितगाव आणि ढाकाच्या रस्त्यांवर हजारो आंदोलक उतरले होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबर बुलेटचा वापर केला. तर, रविवारी (२८ मार्च) हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मनबरियामध्ये एका ट्रेनवर हल्ला केला. यामध्ये १० जण जखमी झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनवर झालेल्या हल्ल्यात इंजिन रुम आणि जवळपास सर्वच कोचचे नुकसान झाले आहे. ब्राह्मनबरियामध्ये जाळपोळ होत असल्याचे पत्रकार जावेद रहीम यांनी सांगितले. काही सरकारी कार्यालयांना आगी लावण्यात आल्या आहेत. प्रेस क्लबवरही हल्ला करण्यात आला असून अनेकजण जखमी आहेत. यामध्ये प्रेस क्लबच्या अध्यक्षांचाही समावेश आहे. त्याशिवाय काही हिंदू मंदिरावरही हल्ला झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींच्या बांगलादेश दौऱ्यानंतर पाकिस्तानातल्या रावळपिंडीत १०० वर्षे जुन्या मंदिरावर देखील कट्टर वाद्यांनी हल्ला केला.याला “योगायोग” म्हणता येईल का?
भारत पाक फाळणी झाल्यापासूनच पाकिस्तान मध्ये हिंदूंवर व मंदिरावर सतत हल्ले होत आहे.हिंदू मुलींना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावून धर्म परिवर्तन करून लग्न लावून दिले जात आहे.
एकतर बांगलादेश किंवा पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये हिंदू कमालीचे असुरक्षित जगत आहेत. ही बाब नवी नाही. मोदी जेव्हा बांगलादेशासारख्या मुस्लीम बहुल देशात जातात तेव्हा तेथील हिंदूंना ते आशास्थान वाटतात, ही बाब देखील लपून राहिलेली नाही. अशा स्थितीत ते दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर जर हिंदू समाजावर आणि मंदिरांवर हल्ले होत असतील, तर ती नुसती चिंताजनक बाब आहे. भारताने राजनैतिक पातळीवर काही कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, हे ठासून सांगणारी ती बाब ठरते आणि तशी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.