‘बाहुबली’ चित्रपटातील ‘कटप्पा’ यांची प्रकृती चिंताजनक
चेन्नई : ‘बाहुबली’ चित्रपटात कटप्पा भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. शूटिंगदरम्यान सत्यराज यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. कोरोना रिपोर्ट आल्यानंतर ते क्वारंटाईन होते. पण आत तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्यराज यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सत्यराज यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. परंतु रिपोर्टनुसार त्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे जाणवली आहेत. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्यराज यांनी १९७८ साली अभिनयाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण ‘बाहुबली’ चित्रपटात कटप्पा भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. शिवाय त्यांनी अभिनेता दीपिका पादुकोण स्टारर ”चेन्नई एक्सप्रेस” चित्रपटात दीपिकाच्या वडिलांची आणि एका भयानक डॉनच्या भूमिकेला न्याय दिला. या चित्रपटाने देखील बॉस्क ऑफिसवर तुफान कामगिरी केली.