Top Newsराजकारण

पेपरफुटीनंतर ठाकरे सरकारला जाग; आता सर्व परीक्षा एमकेसीएल, आयबीपीएस आणि टीसीएस घेणार

मुंबई : राज्यातील विविध शासकीय विभागांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा आता ३ संस्थांच्या माध्यमातून होणार आहेत. एमकेसीएल, आयबीपीएस आणि टीसीएसच्या माध्यमातूनच परीक्षा घेण्यात येणार आहेत.

आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये घोटाळा निर्माण झाला होता. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्यासंबंधात पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळे मोठा प्रमाणात आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत होता. राज्य सरकारवर सुद्धा कडाडून टीका करण्यात आली होती. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. पूर्वी ज्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येत होत्या. त्याच संस्थांच्या माध्यमातून त्या परीक्षा घेण्यात याव्यात. यावरती मंत्री मंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे एएमकेसीएल, आयबीपीएस आणि टीसीएस या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून राज्यातील विभागात ज्या पद्धतीने परीक्षा होणार आहेत. त्याच माध्यमातून परीक्षा घेण्यात याव्यात. यावर देखील चर्चा झाली आहे. मुख्यत्वे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सहमती दर्शवली आहेत. त्यामुळे पुढील भविष्यात होणाऱ्या परीक्षा या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून होणार आहेत.

२०१४ मध्ये सुद्धा तिन्ही संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र सरकार बदलल्यामुळे ते खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आली होती. त्यामुळे हे सर्व प्रकरण बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु महाविकास आघाडीने आता मोठा निर्णय घेतला असून येत्या काळात त्यामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button