अर्थ-उद्योग

‘टाटा स्‍टारबस’ने गाठला १ लाख मालकांचा टप्‍पा

मुंबई : टाटा मोटर्स ही भारताची सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी १ लाख स्‍टारबस मालकांचा टप्‍पा गाठण्‍याच्‍या क्षणाला साजरे करत आहे. टाटा स्‍टारबस देशातील सर्वात प्रबळ फुली-बिल्‍ट बस ब्रॅण्‍ड आहे आणि प्रवासी आरामदायीपणा, विश्‍वसनीयता व सुलभ ड्रायव्हिंगशी समानुपाती आहे. कर्मचारी, विद्यार्थी परिवहन अशा अनेक उपयोजनांसाठी स्‍टारबस प्‍लॅटफॉर्म विविध कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे आणि देशाच्‍या सार्वजनिक परिवहन विभागातील महत्त्वपूर्ण आधार राहिला आहे; स्‍टारबस इलेक्ट्रिक बस म्‍हणून देखील उपलब्‍ध आहे आणि भारतभरातील विविध शहरांमध्‍ये यशस्‍वीरित्‍या कार्यान्वित आहे. स्‍टारबस मालकीहक्‍काचा कमी खर्च आणि उच्‍च लाभक्षमतेमुळे अनेक ताफा ऑपरेटर्ससाठी पसंतीची बस राहिली आहे.

स्‍टारबसच्‍या यशाबाबत सांगताना टाटा मोटर्सच्‍या प्रॉडक्‍ट लाइन – बसेसचे उपाध्‍यक्ष रोहित श्रीवास्‍तव म्‍हणाले, ”आम्‍ही भारतीय रस्‍त्‍यांवर १ लाख स्‍टारबस वाहनांचा लक्षणीय मैलाचा दगड साजरा करत असताना आमच्‍यासाठी हा अभिमानास्‍पद क्षण आहे आणि यामधून ग्राहकांचा आमच्‍यावरील विश्‍वास दिसून येतो. टाटा स्‍टारबस उद्योगातील सर्वात वैविध्‍यपूर्ण बस ठरली असून कर्मचारी परिवहन आणि स्‍कूल बस म्‍हणून सुरक्षित व विश्‍वसनीय प्रवास अशा उपयोजनामध्‍ये लक्‍झरी प्रवास अनुभव देत आहे. टाटा स्‍टारबस व्‍यावसायिक वाहन उद्योगक्षेत्रातील सर्वात प्रबळ ब्रॅण्‍ड बनला आहे आणि भारताच्‍या प्रबळ परिहवन विभागाची महत्त्वपूर्ण भाग आहे. आम्‍ही टाटा मोटर्समध्‍ये सतत विश्‍वास दाखवलेल्‍या सर्व ग्राहकांचे मन:पूर्वक आभार मानतो.”

स्‍टारबससह टाटा मोटर्सने भारतामध्‍ये ओईएम-बिल्‍ट बस संकल्‍पना सादर केली. टाटा मार्कोपोलोच्‍या रचनेमधील सखोल माहितीचा लाभ घेत तयार करण्‍यात आलेल्‍या स्‍टारबसची आकर्षक रचना व मॉड्युलर आर्किटेक्‍चर सुधारित ग्राहक अनुभवाची आणि ताफा मालकांच्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ होण्‍याची खात्री देतात. कर्नाटकमधील धरवाड येथील अत्‍याधुनिक उत्‍पादन केंद्रामध्‍ये निर्माण करण्‍यात आलेल्‍या स्‍टारबसमध्‍ये उच्‍च विश्‍वसनीय व सर्वोत्तम रचना दर्जा आहे. वर्षानुवर्षे स्‍टारबस प्‍लॅटफॉर्ममध्‍ये सतत सुधारणा झाली आहे आणि उद्योगक्षेत्रामध्‍ये व्‍हाइटस्‍पेसेसची पोकळी ओळखण्‍यासोबत त्‍यांचे निराकरण करत आले आहे. टाटा स्‍टारबस समूह ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी नवोन्‍मेष्‍कारी सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यासोबत सादर करत राहिल.

टाटा स्‍टारबस समूह टाटा मोटर्सच्‍या ‘पॉवर ऑफ ६’ तत्त्वाचे पालन करते, जे उत्तम लाभ, सुधारित कार्यक्षमता, अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधा, सुधारित डिझाइन व उच्‍च मूल्‍य देते. तसेच अपटाइपमध्‍ये अधिक वाढ करण्‍यासाठी आणि मालकीहक्‍काचा एकूण खर्च कमी करण्‍यासाठी या वेईकलमध्‍ये टाटा मोटर्सचे सानुकूल ताफा व्‍यवस्‍थापनाकरिता असलेले नेक्‍स्‍ट-जनरेशन डिजिटल सोल्‍यूशन फ्लीट एजचे प्रमाणित फिटमेंट देखील आहे. टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहन ड्रायव्‍हर कल्‍याणाप्रती कंपनीची कटिबद्धता – संपूर्ण सेवा व टाटा समर्थ, अपटाइम गॅरंटी, ऑन-साइट सर्विस, सानुकूल वार्षिक मेन्‍टेनन्‍स आणि फ्लीट मॅनेजेमेंट सोल्‍यूशन्‍स असे इतर लाभ देते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button