अर्थ-उद्योग
टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतींमध्ये १ जानेवारी २०२२ पासून वाढ होणार
मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने त्यांच्या व्यावसायिक वाहन श्रेणीच्या आगामी किंमतीमधील वाढीची घोषणा केली आहे. किंमतीमधील ही वाढ २.५ टक्के असून १ जानेवारी २०२२ पासून लागू असेल. ही वाढ वाहनाचे वैयक्तिक मॉडेल व व्हेरिएण्टनुसार एमअॅण्डएचसीव्ही, आयअॅण्डएलसीव्ही, एससीव्ही आणि बस या विभागांमध्ये लागू असेल.
स्टील, अॅल्युमिनिअम आणि इतर मौल्यवान धातू अशा वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ, तसेच इतर कच्च्या मालांचा अधिक खर्च यामुळे व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. कंपनी उत्पादनाच्या विविध पातळ्यांवर अधिक खर्चाचा सामना करत असल्यामुळे एकूण इनपुट खर्चांमधील लक्षणीय वाढीला अनुसरून किमान किंमत वाढीच्या माध्यमातून काही प्रमाणात वाढ करणे आवश्यक होते.