टाटा मोटर्सकडून टियागो व टिगोरमध्ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच
मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्या अग्रगण्य ऑटोमोबाइल ब्रॅण्डने आज त्यांचे लोकप्रिय ब्रॅण्ड्स – टियागो व टिगोर यामध्ये प्रगत सीएनजी तंत्रज्ञान लाँच केले. आयसीएनजी सक्षम वाहने आनंददायी ग्राहक अनुभवासह अविश्वसनीय कार्यक्षमता, दर्जात्मक सुरक्षितता देतात आणि या वाहनांमध्ये प्रभावी वैशिष्ट्यांसह सेगमेंट-फर्स्ट तंत्रज्ञाने व त्रासमुक्त मालकीहक्काचा समावेश आहे.
या लाँचसह टाटा मोटर्सची सीएनजी बाजारपेठेतील त्यांची उपस्थिती प्रबळ करण्याची, ग्राहकांना स्टाइलमध्ये ड्राइव्ह करण्यामध्ये सक्षम करण्याची आणि कोणतीही तडजोड न करता प्रगत सीएनजी तंत्रज्ञानाचा अनुभव देण्याची योजना आहे. भारतातील सीएनजी बाजारपेठांशी संलग्न राहत टाटा मोटर्सची नवीन आयसीएनजी श्रेणी टियागो आयसीएनजीसाठी 6,09,900 लाख रूपये, एक्स-शोरूम दिल्ली या सुरूवातीच्या किंमतीत कंपनीच्या अधिकृत सेल्स आऊटलेट्समध्ये उपलब्ध असेल.
या लाँचबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, किफायतशीर वैयक्तिक गतीशीलता, तसेच हरित, उत्सर्जन अनुकूल गतीशीलतेसाठी मागणी झपाट्याने वाढत आहे. सीएनजी सक्षम वाहनांच्या झपाट्याने विकसित होणा-या विभागामध्ये या प्रवेशासह आम्ही आमच्या सूक्ष्मदर्शी ग्राहकांना अधिक निवड देत आहोत. आमची आयसीएनजी श्रेणी अविश्वसनीय कार्यक्षमता, प्रिमिअम वैशिष्ट्यांची व्यापक रेंज, अपमार्केट इंटीरिअर्स आणि तडजोड न करणा-या सुरक्षिततेसह आनंददायी अनुभव देते. डिझाइन, परफॉर्मन्स, सेफ्टी व टेक्नोलॉजी या ४ आधारस्तंभांवर विकसित करण्यात आलेले वैशिष्ट्यांनी संपन्न आयसीएनजी तंत्रज्ञान विकासासाठी नवीन मार्ग खुले करण्याकरिता कार्स व एसयूव्हींच्या आमच्या लोकप्रिय ‘न्यू फॉरेव्हर’ श्रेणीप्रती लोकप्रियतेमध्ये अधिक वाढ करेल.
नवीन टियागो आयसीएनजी व टिगोर आयसीएनजीमध्ये रेवोट्रॉन १.२ लिटर बीएस-६ इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन ७३ पीएसची अधिकतम शक्ती निर्माण करते, जी या विभागामधील कोणत्याही सीएनजी कारसाठी सर्वोच्च आहे. आयसीएनजी कार्समध्ये दर्जात्मक तंत्रज्ञान व वैशिष्ट्ये आहेत. तसेच या कार्स सानुकूल कार्यक्षमता देण्यासाठी आणि पेट्रोल ते सीएनजी व सीएनजी ते पेट्रोल या इंधन मोड्सच्या एकसंधी शिफ्टिंगसाठी उत्तमरित्या प्रोग्राम करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांना तडजोड न करता सर्वोत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. सीएनजी ग्राहकांना अनेक पर्यायांमधून निवड करण्याची सुविधा देण्याच्या प्रयत्नामध्ये टाटा मोटर्सने टियागो व टिगोरच्या ट्रिम लेव्हल्समध्ये त्यांची आयसीएनजी वाहने लाँच केली आहेत. यांची किंमत खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
‘इन्क्रेडिबल’ कार्यक्षमता – दर्जात्मक शक्ती, सुलभ गतीशीलता, प्रत्येक प्रदेशामध्ये प्रभावी ड्रायव्हिंग आणि रिटर्न्ड सस्पेंशनसह टियागो व टिगोर आयसीएनजी त्यांच्या संबंधित विभागामध्ये निश्चितच सर्वात शक्तिशाली कार्स आहेत.
‘आयकॉनिक’ सुरक्षितता – सुरक्षिततेसाठी प्रमाणित व्यासपीठावर निर्माण करण्यात आलेल्या दोन्ही कार्समध्ये अत्यंत मजबूत स्टीलचा वापर करण्यात आला असून दर्जात्मक सुरक्षितता वैशिट्ये आहेत- जसे ड्युअल एअरबॅग्ज, एबीएससह ईबीडी व कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल.
‘इंटेलिजण्ट’ तंत्रज्ञान – सिंगल अडवान्स ईयीसू, इंधनांमध्ये ऑटो स्विचओव्हर, सीएनजीमध्ये डायरेक्ट स्टार्ट (सेगमेंट फर्स्ट), जलद रिफ्यूइलिंग आणि डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह टियागो व टिगोर आयसीएनजी त्यांच्या मालकांना अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधा देण्यासाठी उत्तमरित्या डिझाइन करण्यात आल्या आहेत.
‘इम्प्रेसिव्ह’ वैशिष्ट्ये – ग्राहकांना आनंददायी मालकीहक्क अनुभव मिळण्याच्या खात्रीसाठी दोन्ही कार्समध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्यांची भर करण्यात आली आहे. टियागो आयसीएनजीमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, बाहेरील भागावर क्रोम सजावट आणि प्रिमिअम ब्लॅक व बीज ड्युअल टोन इंटीरिअर्स अशी नवीन वैशिष्ट्ये आहेत. टिगोर आयसीएनजीमध्ये रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, ड्युअल टोन रूफ, नवीन सीट फॅब्रिक आणि नवीन ड्युअल टोन ब्लॅक व बीज इंटीरिअर्स अशी वैशिष्ट्ये आहेत.
तसेच सध्याच्या कलर पॅलेटमध्ये अधिक भर करत कंपनीने टियागोमध्ये आकर्षक नवीन मिडनाइट प्लम आणि टिगोरमध्ये मॅग्नेटिक रेड या रंगांची भर केली आहे. दोन्ही कार्स सर्व ग्राहकांसाठी प्रमाणित पर्याय म्हणून २ वर्षांची वॉरंटी किंवा ७५,००० किमीपर्यंतच्या वॉरंटीसह येतील, जे अगोदर होईल ते लागू असेल.