अर्थ-उद्योग

टाटा मोटर्सकडून इक्विटस एसएफबीच्या सहयोगाने स्‍मॉल कमर्शियल वेईकल ग्राहकांसाठी आकर्षक आर्थिक सुविधा

मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने ग्राहकांना आकर्षक आर्थिक सुविधा देण्‍यासाठी इक्विटस एसएफबी या देशाच्‍या सर्वात मोठ्या स्‍मॉल फायनाल्‍स बँकेसोबत पाच वर्षांच्‍या सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. टाटा मोटर्स स्‍मॉल कमर्शियल वेईकल (एससीव्‍ही) श्रेणीमध्‍ये लाभ उपलब्‍ध असण्‍यासोबत या सहयोगाचा महत्त्वाकांक्षी ग्राहकांना फायनान्सिंग एकसंधीपणे उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. टाटा मोटर्स ८६१ शाखा आणि ५५० हून अधिक सीव्‍ही ग्राहक टचपॉइण्‍ट्स असलेल्‍या इक्विटस एसएफबीच्‍या देशभरातील प्रबळ नेटवर्कचा लाभ घेत या सुविधा ग्राहकांना उपलब्‍ध करून देईल.

टाटा मोटर्स एससीव्‍ही श्रेणीने जवळपास ३० लाख भारतीयांना उदरनिर्वाहाचे उत्तम साधन देत ग्रामीण व शहरी भागांमध्‍ये स्‍वयं-रोजगार दिला आहे. टाटा मोटर्स २००५ मध्‍ये भारताचा पहिला चार-चाकी मिनी-ट्रक एस सादर करत एससीव्‍ही विभागामध्‍ये अग्रणी बनली आणि विविध उपयोजनांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या वाहनांमध्‍ये सुधारणा केल्‍या आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रामध्‍ये झपाट्याने होणा-या विकासाची पूर्तता करत टाटा एस आणि टाटा इन्‍ट्रा शेवटच्‍या अंतरापर्यंतच्‍या परिवहनासाठी पसंतीच्‍या वेईकल्‍स आहेत.

या सहयोगाबाबत बोलताना इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या रिटेल अ‍ॅसेट्सचे वरिष्‍ठ अध्‍यक्ष व प्रमुख रोहित गंगाधर फडके म्‍हणाले, आम्‍हाला बँकेच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍येच टाटा मोटर्स लिमिटेडसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून इक्विटस आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत विभागांमधील समुदायांपर्यंत पोहोचत त्‍यांना टाटा मोटर्स लिमिटेडकडून त्‍यांचे पहिले व्‍यावसायिक वाहन खरेदी करण्‍यामध्‍ये साह्य करेल. इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँकेचा नेहमीच आर्थिक समावेशनाला चालना देण्‍यासाठी समाजाच्‍या सेवा न मिळालेल्‍या व असुरक्षित विभागाची प्रगती करण्‍यावर विश्‍वास राहिला आहे.

या सहयोगाबाबत बोलताना टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल वेईकल बिझनेस युनिटमधील विक्री व विपणन विभागाचे उपाध्‍यक्ष राजेश कौल म्‍हणाले, आम्‍हाला आमच्‍या वाहनांची व्‍यापक श्रेणी सुलभ फायनान्सिंग व स्थिर परतावा पर्यायांसह अधिकाधिक ग्राहकांना उपलब्‍ध करून देण्‍यासाठी इक्विटस एसएफबी या भारताच्‍या आघाडीच्‍या स्‍मॉल फायनान्‍स बँकेसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. व्‍यापक ३ दशलक्ष ग्राहक डेटाबेस आणि विभागामधील कौशल्‍याच्‍या सततच्‍या कार्यकालासह इक्विटस एसएफबी आम्‍हाला देशभरातील सीव्‍ही ग्राहकांना लाभदायी ऑफरिंग्‍ज देण्‍यामध्‍ये साह्य करेल. टाटा मोटर्सने आपल्‍या प्रयत्‍नांमध्‍ये नेहमीच ग्राहक कल्‍याणाला प्राधान्‍य दिले आहे आणि त्‍यांना लाभदायी मूल्‍य देण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. एस व इन्ट्रा श्रेणीने शेवटच्‍या अंतरापर्यंतच्‍या परिवहनाला आरामदायी, विश्‍वसनीय व मालकीहक्‍काच्‍या कमी खर्चासह पुनर्परिभाषित केले आहे. या सहयोगासह आम्‍ही इक्विटस एसएफबीसोबत सहयोगाने ग्राहकांना सेवा देण्‍यासाठी आमचे समर्पित प्रयत्‍न सुरूच ठेवू.

व्‍यावसायिक वाहन क्षेत्रामधील बाजारपेठ अग्रणी म्‍हणून टाटा मोटर्स सातत्‍याने ग्राहकांशी संलग्‍न होत उत्‍पादन व सेवांसंदर्भातील त्‍यांच्‍या गरजा व आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यासोबत त्‍यांना आर्थिक साह्य देखील देते. टाटा मोटर्स त्‍यांच्‍या विद्यमान व भावी ग्राहकांना सुलभ व एकसंधी फायनान्सिंग अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी ग्राहक-केंद्रित प्रयत्‍न व उपक्रमांमध्‍ये गुंतवणूक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button