इतर

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेची कार जप्त; ‘एनआयए’ची कारवाई

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ‘एनआयए’च्या अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सुनील माने याची कार ‘एनआयए’ने जप्त केली आहे. सुनील माने याच्या घरी ‘एनआयए’नं काल रविवारी छापेमारी केली. यावेळी काही कागदपत्र आणि कार जप्त करण्यात आली. निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

‘एनआयए’ने रविवारी अंधेरी, कांदिवली आणि बोरिवली भागात छापेमारी केली. सुनील माने याच्या घरी छापा टाकत ‘एनआयए’ने मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. तसंच या वेळी ‘एनआयए’ने मानेच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे माने देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील मानेला अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेची मदत करण्याचा सहभाग आढळल्याने अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असता एनआयएच्या विशेष न्यायालयाने सुनील माने यांना २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहितीएनआयएने न्यायालयात दिली होती. दरम्यान, ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने ‘एनआयए’ कोठडी सुनावल्यानंतर अखेर सुनील माने यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.

मनसुख हिरण यांचा चेहरा झाकलेले रुमाल सचिन वाझेनेच खरेदी केले!

५ मार्च रोजी जेव्हा मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेती बंदरमध्ये सापडला होता, तेव्हा त्यांचा चेहरा मंकी कॅपने झाकलेला होता. यामध्ये अनेक रुमालही आढळले होते. एनआयएला नुकतंच तपासात समजलं की, ते सर्व रुमाल ४ मार्च रोजी कळवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर रुमाल विक्रेत्याकडून खरेदी केले होते. हे रुमाल खरेदी करणारा इसम दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझे होता.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं की, त्यांना त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज मिळालं असून त्यात एक व्यक्ती रुमाल खरेदी करताना दिसत आहे. तो व्यक्ती हूबेहूब सचिन वाझेसारखाच दिसत आहे. यंत्रणेला संशय आहे की त्या सर्व रुमालांचा वापर मनसुख हिरण यांचा चेहरा झाकण्यासाठी केला असावा. “या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी आम्ही प्रत्येक बिंदू जोडत आहोत, जेणेकरुन कोर्टातही आरोपींना शिक्षा देता येईल, असं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. याच प्रकरणात एनआयएने त्या रुमाल विक्रेत्याचा जबाबही नोंदवला आहे.

सुरुवातीला सचिन वाझेने सगळ्यांनाच आपण घटनेच्या वेळी मुंबईत असल्याचं खोटं सांगितलं होतं. परंतु एटीएस आणि एनआयएच्या तपासात त्याचं खोटं उघड झालं. दोन्ही यंत्रणांना एवढं सीसीटीव्ही फूटेज मिळालं आहे की, ज्यामुळे सचिन वाझेने सांगितलेली प्रत्येक खोटी ठरत आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, सचिन वाझे ४ मार्च रोजी साडेआठ वाजता कळवा स्टेशनवर पोहोचला होता. तिथे उतरल्यानंतर तो स्टेशनजवळच्याच एका रुमाल विक्रेत्याकडे गेला आणि त्याच्याकडून अनेक रुमाल खरेदी केले. एनआयएने आता सेकंड ओपनियन घेण्यासाठी ते सर्व रुमाल पुण्यातील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

या प्रकरणात अटकेत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे, निलंबित हवालदार विनायक शिंदे, क्रिकेट बुकी नरेश गोर आणि निलंबित एपीआय रियाजुद्दीन काजी हे जेल कस्टडीमध्ये आहेत. निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने एनआयए कोठडीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button