मराठा समाजाचा रविवारचा मोर्चा रद्द : विनायक मेटे
बीड : राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यामुळे मराठा समाजातील तरुण आणि तरुणी, मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे १६ मे रोजी मराठा आरक्षण मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. हा मोर्चा बीडमधून निघणार होता परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवल्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. तो असंतोष रस्त्यावर येऊ नये यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवला असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.
बीडमधून १६ मे रोजी काढण्यात येणारा मराठा मोर्चा लॉकडाऊन वाढवल्यामुळे आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती मराठा आरक्षणाच्या निकालानंतर मराठा समाज राज्यातून मोर्चे काढणार होता. यामध्ये पहिला मोर्चा बीडमधून काढण्यात येणार होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाऊन केला होता. यामुळे लॉकडाऊन संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ मे रोजी मराठा मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण सांगत राज्य सरकारने लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवला आहे. यामुळे हा मराठा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये वरच्यावर शांतता पसरवली आहे. परंतु आतील खाली प्रचंड असंतोष मराठा समाजामध्ये पसरला आहे. तो असंतोष रस्त्यावर येऊ नये यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे. हा लॉकडाऊन केवळ मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी वाढवण्यात आला आहे. तरिही मराठा समाज, शिवसंग्राम हे गप्प बसणार आहे. बीडमधून मराठा मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. परंतु तो आता १६ मे एवजी ४ ते ५ जूनला ठरवून काढण्यात येणार असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटले आहे.